Search
Sign In

अलिबाग मध्ये आपले स्वागत

अथांग समुद्राची साथ लाभलेले, निसर्ग रम्य आधुनिक टुमदार शहर

About Alisa Noory

भौगोलिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे व अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असणारे ठिकाण. हजारो वर्षांच्या इतिहासात अनेक राजवटींनी राज्य केलेले, त्याचा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जतन करून आधुनिकतेशी सांगड घालणारे अलिबाग. नारळी पोफळीच्या हिरव्यागार झाडीने भरलेले व अस्सल कोकणी परंपरा जपलेले. अनेक ऐतिहासिक किल्ले, पुरातन मंदिरे, सुंदर समुद्रकिनारे, व जोडीला अस्सल कोकणी, चवदार खाद्यपदार्थ यामुळे अगदी दूरपर्यंत पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले निसर्ग रम्य, अलिबाग.

या आपल्या अलिबागमधील सर्व प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे किल्ले व इतर वास्तू, पुरातन मंदिरे, व अनेक निसर्गरम्य परिसर, येथील संस्कृती, परंपरा, उत्सव, निसर्ग विविधता, या आणि अशा अनेक गोष्टीच्या अभ्यास करून, प्रत्यक्ष भेट देऊन, अनेक संदर्भ , माहिती आणि चित्रांचा प्रचंड साठा संकलन करून सज्ज झालेले हे अलिबागचे वैशिष्ट्यपुर्ण पोर्टल “AlibagOnline® “. आमचा प्रत्येक लेख आपल्याला माहिती, संदर्भ आणि इमेजेस देण्यासाठी काळजीपूर्वक तयार केला आहे. अलिबागचे रहिवासी तसेच अलिबागला भेट देणारे सर्व पर्यटक व अलिबागप्रेमी यांना अलिबागची खरी ओळख करून देण्यासाठी हे पोर्टल नक्कीच मदत करेल.

अलिबाग शहराचा इतिहास

सम्राट अशोकाच्या काळापासून अपरान्त अर्थात कोकण या भागाचा उल्लेख आढळतो. कोकणचे साधारणतः ४० हजार वर्षापूर्वीचे पुराश्मयुगीन मानवाचे अस्तित्व काही पुरातन उपकरणांवरून सिद्ध झाले आहे. रायगड जिल्ह्याला लोहयुगापासून इतिहास आहे. या भूप्रदेशावर मौर्य, सातवाहन, क्षत्रप, त्रैकूटक, कलचुरी, कोकणचे मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, बहमनी, गुजरातचे सुलतान, अहमदनगरची निजामशाही, पोर्तुगीज, सिद्धी, मराठे, मुघल, आंग्रे व ब्रिटिश अशा राजवटींनी राज्य केले.
अलिबाग शहराचा इतिहास
Historic Alibag

अलिबागचे बदलते स्वरूप

अलिबाग – हजारो वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणारे अलिबाग. शिवकालीन शौर्याची गाथा सांगणारे अलिबाग. जगाच्या नकाशावर विविध घडामोडींसाठी कोरले गेलेले अलिबाग. याच मातीत घडले वीर जवान, उच्च पदस्थ अधिकारी, राष्ट्रीय पातळीवरचे कलाकार, खेळाडू , व्यवसायिक. या अलिबागचा गेल्या २० -३० वर्षातला बदलता चेहरा मोहरा पाहण्याचे भाग्य लाभले त्याचे हे संक्षिप्त स्वरूप. अलिबागचे बदलते स्वरूप
Fast growing Alibag

अलिबागचे पर्यटन

अलिबाग ! निसर्गाच्या सानिध्यातील एक नयनरम्य ठिकाण. ऐतिहासिक वारसा व नैसर्गिक विविधतेने नटलेले. अलिबाग जवळील चौल हे महत्वाचे बंदर इतिहासकाळात फार प्रसिद्ध असल्याने फार पूर्वीपासून येथे देशी विदेशी पर्यटक, व्यापारी, राज्यकर्ते यांचे लक्ष वेधून घेणारा प्रदेश. अलिबागपासून मुंबई हे महत्वाचे ठिकाण जवळ असल्याने ह्या ठिकाणाला अजून जास्त महत्व प्राप्त झाले.
अलिबागचे पर्यटन
Tourism at Alibag

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password