Search
Sign In

पारंपरिक उद्योगधंदे

अलिबागमधील उद्योगधंदे पहिले तर फार प्राचीन काळापासून भरभराटीस आलेले. मीठ निर्मिती व कुटीर उद्योग हे येथील प्राचीन व्यवसाय. चौल, महाड, गोरेगाव, राजपुरी बंदरामधून बराच माल परदेशी निर्यात होत असे. छत्रपती शिवाजी महारांनी जहाज बांधणीचा व्यवसाय सुरु केला, कान्होजी आंग्रेंनी तो नंतर पुढे चालविला. मुघल व पोर्तुगीझ काळापासून रेशमी व सुती कापडाचा व्यवसाय चालत आलेला नंतर तो हळूहळू कमी झाला. १८४० च्या एका उल्लेखानुसार रेवदंडा येथे पितांबर विणणारे कुशल कारागीर होते.
नंतर १८९७ मध्ये भातगिरणी सुरु झाली स्वातंत्र्यपूर्व काळात औद्योगिकरण तसे संथ गतीने चालू होते स्वातंत्र्यानंतर मात्र त्यास चालना मिळाली. मागील शतकापासून पनवेल बैलगाडीची चाके बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. नजीकच्या कर्नाळा जंगलातील टणक सागापासून चाके बनवितात. येथील चाकजोडांना रायगड, सातारा, अहमदनगर, पुणे , कोल्हापूर येथून मागणी असते.

अशाप्रकारचे अनेक उद्योग येथे चालू आहेत, त्यापैकी काही उद्योगांचा घेतलेला हा आढावा

Salt Pans

अलिबागची मिठागरे

अलिबागला लाभलेला अथांग समुद्र आणि ह्या समुद्राने दिलेले नैसर्गिक वरदान म्हणजेच मत्स्य व्यवसाय, जल वाहतूक आणि आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा घटक म्हणजे मीठ. प्राचीन काळापासून शेतीनंतर मीठ उत्पादन हा मोठा व्यवसाय होता. शिवाजी महाराजांच्या राजवटीमध्ये सुद्धा हा मोठा उद्योग असल्याचे दिसून येते. पोर्तुगीज अमलाखालील गोव्यातील स्पर्धेमुळे या उद्योगावर विपरीत परिणाम ...
Ganpati-factory

गणपती कारखाना

Marathi अलिबाग मधील छोट्या छोट्या गावातही अनेक मूर्ती कलाकार आहेत. गणपती बनवण्याचा पारंपारिक व्यवसाय इथल्या अनेक गावात चालू आहे. शाडूच्या मातीची सुबक गणेश मूर्ती, वापरलेले सुंदर रंग आणि रेखाटलेले सुबक डोळे यामुळे या मुर्त्या आकर्षक दिसतात. महाराष्ट्र तसेच देशातील काना कोपऱ्यातून व परदेशातूनही या मूर्तींना विशेष मागणी आहे. अलिबाग मधील ...

मत्स्य शेती

समुद्रात होणाऱ्या मासे मारी सोबत वाढती मागणी लक्षात घेऊन पेण आणि अलिबाग परिसरात खाऱ्या पाण्यात व गोड्या पाण्यात अंधुनिक पद्धतीने मत्स्य शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. समुद्रातील खारे पाणी खाडी परिसरात तळी करून साठवले जाते व त्यात उत्कृष्ट अशी मत्स्य बीजे टाकली जातात व तिथे मोठ्या प्रमाणावर मासे पाळले जातात. ...
Betelnut

सुपारी

निसर्गाचे वरदान लाभलेल्या अलिबाग मुरुड परिसरामध्ये सुपारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. सुपारीचे उत्पादन आणि व्यापार हा या परिसरामध्ये फार पूर्वीपासून चालत आलेला पारंपरिक व्यवसाय आहे . या परिसरामधून दर वर्षी करोडो रुपयांची सुपारी देशभर पाठवली जाते, व तिथून निर्यात सुद्धा केली जाते. अनुकूल वातावरणामुळे येथील सुपारी उत्कृष्ट प्रतीची असते ...

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password