Search
Sign In

AlibagOnline® – एक संकल्पना

२०१८
०१ .

AlibagOnline® - एक संकल्पना

अलिबाग ऑनलाइन ही एक संकल्पना आहे अलिबागकारांची. आम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अलिबागबद्दल बरीच माहिती पसरत असलेली पहिली. पर्यटक अलिबागला फक्त समुद्रकिनाऱ्यांना भेट देण्यासाठी आणि सी-फूडचा आनंद घेण्यासाठी आलेले आम्ही पाहिले. ऐतिहासिक महत्त्व असलेली अनेक उपेक्षित ठिकाणे आम्ही पाहिली. आम्ही अनेक निसर्गरम्य ठिकाणे पाहिली जी अजूनही जगाला अज्ञात आहेत. आणि शेवटी, जगाला खरे अलिबाग जाणून घेण्यास मदत करण्यासाठी इत्यंभूत माहितीसह आपले अलिबाग ऑनलाइन आणण्याची संकल्पना आम्ही पाहिली.

The Concept - AlibagOnline
२०१९ पासून चालू
०२ .

टीम भटकंती

"The world is a book and those who do not travel read only one page." -Saint Augustine

वेगवेगळ्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देणे हे मोठे आव्हान होते. आम्ही आमच्या धाडसी भटकंती टीमसोबत ते आव्हान स्वीकारलं. उत्तरेच्या रेवस जेट्टीपासून ते मुरुड जंजिऱ्याच्या दक्षिण टोकापर्यंत या टीमने अनेक किल्ले, प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक ठिकाणे, प्रसिद्ध ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. या ठिकाणांना भेट देताना अनेक अज्ञात माहिती, ऐतिहासिक संदर्भ, कथा, सत्ये यांची माहिती मिळाली. ही माहिती तुमच्यासाठी वेबसाईटवर देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

The Team Bhatakanti
२०२० पासून चालू
०३ .

टीम लेखणी

"Either write something worth reading or do something worth writing." - Benjamin Franklin

आमचा विश्वास आहे की आमच्या वेबसाइट साठी “Content is the King”. प्रचंड माहिती, संदर्भ आणि कथांसह, आमच्या टीम लेखणी यांनी ही सर्व माहिती कागदावर उतरविण्याचे मोठे काम केले आहे. आमचा प्रत्येक लेख अस्खलित भाषेत माहिती देण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वकरित्या तयार केला आहे.

The Team Lekhani
२०२० पासून चालू
०४ .

टीम डिजिटल

“If you are out there shooting, things will happen for you. If you’re not out there, you’ll only hear about it.”
– Jay Maisel
यावर आमचा ठाम विश्वास आहे. आमच्या वेबसाइटवरील प्रत्येक छायाचित्र आमच्या स्वतःच्या कॅमेर्‍यातील आहे. आम्ही या ठिकाणांना भेट दिली तेव्हा आमच्या तज्ज्ञ छायाचित्रकारांनी प्रत्येक क्षण टिपला आहे. येथील विविध स्थळे, इतिहास, संस्कृती, जैवविविधता यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी हजारो छायाचित्रांमधून आम्ही काही निवडले आहेत. आमच्या वेबसाइटवरील अनेक छायाचित्रे तुम्हाला नक्कीच आवडतील.

The Team Digital
२०२१ पासून चालू
०५ .

टीम तांत्रिक

शेवटचा पण महत्वाचा टप्पा, डिझाइन आणि संकल्पना सादर करण्याचा एक मोठा भाग. प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल याची खात्री करून, अधिकाधिक यूजर्सना अनुकूल बनवण्यासाठी ही टीम अनेक महिन्यांपासून संकल्पना आणि डिझाइनवर काम करत आहे.

The Team technical

ध्येयपूर्ती Credits

स्वप्ने अशी पहा, की ती पूर्ण करण्यासाठी तुमची झोप उडाली पाहिजे.


अशीच काही ध्येयवेडी माणसे एकत्र येऊन बनली टीम AlibagOnline®.

AlibagOnline® च्या या पूर्ण प्रवासात आमच्या सोबत आहेत आमचे मित्र, सोबती, आणि स्थानिक रहिवासी. भटकंती टीममध्ये महत्वाचा सहभाग आहे तो म्हणजे श्री निलेश थळे, यांचा. त्यांच्याशिवाय भटकंती अपुरीच. चौल ची सफर आम्हाला घडवली ते आमचे चौलचे रहिवासी मित्र श्री गणेश नाईक यांनी. लेखनाची सुरुवात आम्हाला करून दिली त्या आमच्या स्नेही मनिषा नाईक यांनी. भाषांतराचे मोठे आव्हान पेलले ते आमच्या स्नेही रश्मी म्हस्के यांनी आणि नंतर त्याची धुरा सांभाळली ती श्वेता प्रधान यांनी. आम्हाला तांत्रिक सहकार्य लाभले ते सिद्धाराम तडवलकर, धनंजय मरसाळे, अशोक ठुबे, यांचे.

आम्ही गेल्या काही वर्षात ज्या ज्या ठिकाणांना भेटी दिल्या तेथील स्थानिक रहिवास्यांची सुद्धा आम्हाला मोलाची मदत झाली.

अशा आमच्या हरहुन्नरी सहकाऱ्यांमुळेच आम्ही आज येथपर्यंत आलो आहोत व आम्हाला खात्री आहे कि याच उत्साहाने आम्ही आमचे कार्य पुढे चालू ठेऊ व हे पोर्टल अजून समृद्ध करु.

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password