Search
Sign In

रहाट

रहाट

कोकणातील गर्द हिरव्या परळी पोफळीच्या वाड्या, आणि एक खास वैशिष्ट्य म्हणजे घरामागील विहिरीवर असलेला रहाट. रहाट प्रत्यक्ष पाहिलेली पिढी आज ४० -४५ च्या वरच्या वयाची. पण त्यांनीच खरी कोकणाची मजा घेतलेली. आजकाल इलेक्टिक मशीन च्या जमान्यात हे पारंपरिक रहाट दिसेनासे झालेत. आणि ती खिल्लारी बैलजोडी सुद्धा दुर्मिळच.
पाऊस संपला कि वाड्यांना शिंपणे द्यावे लागत असे (म्हणजे पाणी देणे ). यासाठी विहिरीतून पाणी काढून वाड्यांना द्यावे लागत असे. हे पाणी काढण्यासाठी पूर्वी इलेक्टिक मोटर नव्हत्या त्यासाठी रहाटाचा फार उपयोग होई. रहाट म्हणजे एक प्रकारचे लाकडी चक्र जे विहिरीवर बांधलेलं असायचे त्याला एक मातीच्या मडक्यांची रांग किंवा माळ असे व हि माळ विहिरीत सोडली जायची मडके खाली जाताना उपडे असायचे व वर येताना त्यात पाणी भरून यायचे. या रहायला गोल फिरण्यासाठी साधारणतः ८-१० फुटांवर लाकडी खांब आडवा लावलेला असे व त्याला काटकोनी आकारातील चक्रे लावून एक बैल गोलाकार फिरत असे. जोपर्यंत बैल फिरत असे तोपर्यंत रहाट चालू. बैलाच्या डोळ्यावर ढापणे लावलेले असे. याचे मानसिक शास्त्र असे कि बैलाला कळू नये कि तो सतत गोल फिरतोय. आणि जर बैलाला कळले कि बराच वेळ तो गोल गोल फिरतोय तर त्याला चक्कर येऊ शकते.

या रहायचे बहुतांशी भाग लाकडी असत, व त्याची झीज होऊ नये म्हणून वंगण टाकत असत. बैलाच्या गळ्यात कधी कधी घुंगरू असत, या घुंगरांचा आणि लाकडी भागांचा एक चाकोरीबद्ध आवाज येई. आणि हा आवाज आजूबाजूच्या ४-६ वाड्यांपर्यंत नक्की जात असे.

रहाट म्हणजे एक प्रकारची समृद्धीचं. ज्या घरी रहाट असे त्या घरी पाण्याने भरलेली विहीर, मोठ्या प्रमाणात नारळी पोफळीच्या वाड्या, गोठ्यामध्ये गाई, बैल, आणि जिथे पाणी मुबलक प्रमाणात तिथे समृद्धी, असे ते गणित. आजच्या आधुनिक युगात या समृद्ध रहाटाची जागा घेतली इवल्याश्या मोटारीने. या मोटारींसोबत ते बैल, तो गुरांचा गोठा , तो रहाट आणि तो कर्णमधुर चाकोरीबद्ध आवाज लय पावलाय. असो बदलत्या जगाबरोबरच कोकण सुद्धा बदलतेय. पण ते जुने कोकण आणि त्याची सर आधुनिकतेला नक्कीच नाही. ज्यांनी रहाट पाहिलेला नाही त्यांच्यासाठी हा एक विडिओ.

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password