Search
Sign In

पुरण पोळी

पुरण पोळी

गरमागरम मऊ पुरणपोळी हे अजून एक कोकणातील वैशिष्ट्य. पुरणपोळी हि साधारणतः महाराष्ट्रामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये बनवितात. पण प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या. तशीच अलिबागची पद्धत वेगळी. होळी च्या सणासाठी येथे घराघरात पुरणपोळी बनते. “होळी रे होळी, पुरणाची पोळी” हे येथील प्रसिद्ध वाक्य आहे. तसेच गणपतीउत्सवामध्ये व अनेक सणांना पुरणपोळी बनतात.

अलिबाग परिसरात पुरणपोळी मैद्यापासून बनवितात. मैदा पाण्यात मिसळून मीठ, रंग टाकून नीट मळून घेतला जातो. नंतर मळलेला मैदा गोडेतेलामध्ये काही तास भिजवून ठेवला जातो. चणाडाळ पाण्यामध्ये शिजवून तेवढ्याच प्रमाणात गूळ त्यामध्ये मिसळला जातो नंतर हे मिश्रण पुरण बनविण्याच्या भांड्यामधून बारीक केले जाते.तेलामध्ये भिजवलेला मैदा परत नीट मौल घेतला जातो व नंतर त्याच्या गोळे करून त्यामध्ये पूर्ण भरून पोळ्या लाटल्या जातात. नंतर हळुवारपणे तव्यावर भाजतात. झाली नरम नरम कुरकुरीत पुरणपोळी तयार. गरम पुराणपोळीवर साजूक तूप टाकून दुधासोबत पोळी खाल्ली जाते. पुरणपोळ्या एकदा बनविल्या कि त्या साधारणतः ५ त ८ दिवस चांगल्या राहतात.

  • 273
  • Special Food
  • Comments Off on पुरण पोळी

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password