Search
Sign In

खाजगी सुपारी उद्योजक

खाजगी सुपारी उद्योजक

अलिबागपासून मुरुड पर्यंतच्या पट्ट्यामध्ये, नागाव, रेवदंडा, चौल या ठिकाणी सुपारीचे उत्पादन बऱ्याच मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे येथे काही स्थानिक नागरिक सुपारीचा उद्योग करतात. परिसरामधील उत्पादकांकडून ओली सुपारी गोळा करायची आणि ती सुकवायची. त्यातील रोठे काढून मग ती मोठमोठ्या बाजारांमध्ये विकायची. या उद्योगांमधून हे उद्योजक चांगला नफा कमावत आहेत, पण त्यासाठी मेहनत सुद्धा तेवढीच घ्यावी लागते.  

साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये सुपारी तयार होते. परिसरामधील उत्पादकांकडून गोळा केलेली सुपारी मोकळ्या जागेमध्ये पसरवून ठेवावी लागते. हे सर्व काम करण्यासाठी एखादी शेतजमीन किंवा मोकळी जमीन वापरावी लागते. याला सुपारीचा पाडा असे म्हणतात. या पाड्यावर आलेली ओली सुपारी ची साले थोड्या प्रमाणात काढून मग सुकवावी लागते, यासाठी स्थानिक स्त्रिया या पाड्यावर येऊन रोजंदारी वर काम करतात. सुपारी पूर्ण सुकली कि मग त्यातले रोठे काढले जातात, आणि मग आकाराप्रमाणे आणि दर्जाप्रमाणे वर्गवारी केली जाते. सुपारी साधारणतः ६ वेगवेगळ्या आकारामध्ये विभागली जाते तसेच साधारणतः ७ ते ८ प्रकारचे वर्गांमध्ये सुपारी विभागली जाते. नंतर हि सुपारी वाशी, मुंबई येथील घऊन बाजारामध्ये विकली जाते.

जून जुलै मध्ये सुपारीच्या झाडाला फुले येऊ लागतात आणि मग २ ते ३ महिन्यामध्ये सुपारी तयार होते, एका झाडाला वर्षभरामध्ये साधारणतः ३०० ते ४०० सुपाऱ्या येतात. एका वर्षांमध्ये साधारणतः ४ ते ५ पाडे घेतले जातात.

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password