Search
Sign In

पोपटी

पोपटी

पोपटी हे एक कोकणातले वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थाचा प्रकार आहे. निसर्गसमृद्ध कोकणातील काही खाद्यपदार्थ आणि त्यांच्या बनविण्याच्या खास वैशिट्यपूर्ण पद्धती या त्या पदार्थाची चव द्विगुणित करतात आणि त्या पदार्थाला एक प्रकारच्या वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. यापैकीच एक वैशिट्यपूर्ण पदार्थ म्हणजे पोपटी. फार जुना तरीही अजून तीच चटपटीत चव. पोपटी लावणे हे एक जिकिरीचे व मेहनतीचे काम. पण जेव्हा आपण खायला बसतो तेव्हा जी काही मजा येते तिला तोड नाही. साधारणतः थंडीच्या दिवसात पोपटी लावली जाते.

एक मध्यम आकाराचे मडके घेऊन त्याला आतल्या बाजूने भामरुट च्या पाल्याचा एक थर द्यावा. भामरुट हा एक छोटासा गवताचा / झुडुपाचा प्रकार असून , हे गवत फक्त कोकण परिसरातच सापडते. या पाल्याच्या विशिष्ट गंध पोपटीला चव आणतो. शेताच्या बांधावर अनेक ठिकाणी हि छोटी झाडे मुबलक प्रमाणात दिसून येतात.

आता या मडक्यात वालाच्या शेंगा, अर्धे कापलेले बटाटे व त्यात मीठ मसाला लावून टाकावेत , अर्धा चिरलेले कांदे पण टाकतात. मध्ये मध्ये या मडक्यात मीठ मसाला आणि ओवा टाकावा. नॉन–व्हेज आवडणारे यात अंडी व चिकन सुद्धा टाकतात. मडके पूर्ण भरल्यावर त्याला व्यवस्थित बंद करावे.

नंतर २ ते ३ विटा घेऊन त्या चुलीप्रमाणे मांडाव्यात त्यावर हे मडके पालथे घालावे , आणि सभोवताली जाळण्याची लाकडे गवत ठेऊन ते पेटवावे. अशा प्रकारे साधारणतः ३० ते ४० मिनीत चांगली आग पेटवत ठेवावी. या आगीच्या उष्णतेने व पाल्याच्या वाफेने आतमधील पदार्थ छान शिजतात. नंतर पोपटी शिजल्याचा सुवास येऊ लागतो. नंतर हे मडके सावकाशपणे काढावे व आतील सर्व पदार्थ बाहेर काढावेत. झाली पोपटी तयार !!! वालाचे दाणे ओल्या खोबऱ्यासोबत फार चविष्ट लागतात. घरातील सगळी मंडळी अंगणात एकत्र बसून पोपटीचा आस्वाद घेणे म्हणजे एक कौटुंबिक मेजवानी. हि विलक्षण चव द्विगुणित करायला अलिबागमधील सुप्रसिद्ध लालभडक कलिंगड सोबत असतेच.

असा हा एकंदर पोपटीचा कार्यक्रम साधारणतः २ ते ३ तास चालतो. आणि त्याच्या आठवणी कायमच्या आपल्यासोबत राहतात. असा हा विलक्षण अनुभव कोकणात येऊन एकदा तरी घ्यावाच.

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password