Search
Sign In

आंबापोळी

आंबापोळी

कोकणातील हापूस आंबा म्हणजे जगप्रसिद्ध चव. आंबा जसा प्रसिद्ध तसेच त्यापासून बनवलेले विविध पदार्थ सुद्धा आवडते. असाच एक पदार्थ म्हणजे आंबापोळी.

आंब्याची अस्सल चव आंब्याचा सीझन संपला तरी पुढे काही महिने जिभेवर रेंगाळत ठेवणारी अशी आंबापोळी. गर्द तपकिरी व भगव्या रंगाची’आंबापोळीचा तुकडा जिभेवर ठेवायचा आणि परत मे महिन्यातल्या आंब्याचा सीझन अनुभवायचा. अस्सल हापूस आंब्याच्या रसापासून बनवलेली आंबापोळी पुढचे काही महिने तरी चांगली टिकते आणि तीच अस्सल चव आपल्याला देते.

पिकलेल्या हापूस आंब्याचा रस काढायचा आणि एका भांड्यामधे मंद आचेवर आटवत ठेवायचा. मधून मधून रस घाटत ठेवायला लागतो. यावेळी रस हातावर उडू शकतो म्हणून काळजी घ्यावी लागते. साधारणतः २० ते ३० मिनिटे आठवल्यावर थोडा थंड होऊन द्यावा, व नंतर एका अल्युमिनियम च्या ताटामध्ये थोडे तूप लावून त्यावर हा रस ओतावा. नंतर व्यवस्थित पसरवून उन्हात सुकत ठेवावा. ४ ते ५ दिवस चांगले ऊन मिळाले कि आंबापोळी तयार.

अलिबाग आणि परिसरात बरेच छोटे मोठे उद्योग अशी विविध प्रकारचे पदार्थ’विकायला ठेवतात. यांना खास करून पर्यटकांकडून मोठी मागणी असते

  • 1416
  • Eat Any Time
  • Comments Off on आंबापोळी

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password