Search
Sign In

आंबा

आंबा

हापूस आंबा – फळांचा राजा, अलिबाग आणि परिसरातील आंब्याची असंख्य झाडे पाहावयास मिळतात, तश्याच विविध प्रकारच्या प्रजाती आणि चवी सुद्धा आढळतात. मूळ कोकणा समान वातावरण व पोषक जमीन यामुळे अस्सल कोकणातील चव येथील खास करून हापूस आंब्याला आलेली आहे. बऱ्याच शेतांमध्ये आजकाल भातशेतीमध्ये आंब्यांची लागवड केलेली दिसून येते.

साधारणतः हिवाळ्याच्या दरम्यान आंब्याच्या झाडाला मोहोर यायला सुरुवात होते, व जशी जशी थंडी वाढत जाते तसा हा मोहोर वाढत जातो व मोठा होतो. नंतर छोट्या छोट्या हिरव्यागार कैऱ्या दिसू लागतात. हिवाळ्यातील दवावर या कैऱ्या वाढू लागतात. नंतर जशी जशी वातावरणात उष्णता वाढू लागते तसे ह्या कैऱ्या मोठ्या होऊन आंबे दिसू लागतात . साधारणतः मार्च नंतर आंबे तयार होण्यास सुरुवात होते. व नंतर आंबे उतरवून ते व्यवस्थित पिकण्यास ठेवले जातात. हापूस आंब्यांची विशेष काळजी घेतली जाते, व पेट्यांमध्ये भरून बाजारात विकायला नेले जातात. हापूस आंबे पूर्ण तयार झाले, आणि पिकण्याआधीच उतरवले जातात. हापूस आंबा हि प्रमुख व प्रसिद्ध जात असली तरीही इतर बऱ्याच जातीचे आंबे अलिबाग आणि परिसरात आढळून येतात.

अलिबागच्या हापूस आंब्याची चव आता सर्वांच्याच जिभेवर रेंगाळू लागली आहे. गेल्या १० ते १५ वर्षांपासून येथे हापूस आंब्याची लागवड व पीक वाढू लागले आहे. आंबे तयार झाले कि अलिबागला जाताना दुतर्फा आंबे विक्रेते दिसू लागतात.

पिकलेल्या आंब्यांची चव जशी खवैयांना आकर्षित करते तसेच आंब्यांचे इत्तर खाद्य पदार्थ सुद्धा फार प्रसिद्ध आहेत. आंबावडी, आंबा लोणचे, मुरंबा, आमसूल, आणि जगप्रसिद्ध  आमरस. असा हा उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करणारा अलिबागचा प्रसिद्ध आंबा. अलिबाग ला आलात कि नक्की चव घ्या.

शास्त्रीय नाव – Mangifera indica

प्रचलित नाव  – Mango, आंबा  

हंगाम  – उन्हाळा

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password