Search
Sign In

कोकम

कोकम

बहुतांशी करून कोकणातच सापडणारे हे फळ कोकम सरबतासाठी मात्र सगळीकडे प्रसिद्ध आहे उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी कोकम सरबत हमखास वापरले जाते. कोकणात, तसेच अलिबागमध्ये सुद्धा कोकमाची झाडे मुबलक प्रमाणात दिसून येतात. हिरवेगार भरगच्च पण उंच असे झाड एप्रिल, मे मध्ये गर्द लाल रंगाच्या कोकमांनी भरून जाते.

कोकमाचा उपयोग सरबतासोबतच जेवणातही बऱ्याच पद्धतीने केला जातो. पिकलेले कोकमाच्या आतील बियांचे सार केले जाते. कोकणातील जेवणात आढळणारे हे एक फार चविष्ट पेय आहे. हे फक्त उन्हाळ्याच्या दिवसातच बनवले जाते. कोकमाच्या सालांचे सुद्धा सार फार चवदार लागते.

कोकम सरबत – अलिबाग आणि परिसरात कोकम सरबताची सोय घरीच केली जाते. कोकमाची सालीचे तुकडे करून एका काचेच्या बरणीत ठेवले जातात, त्यात साखर टाकली जाते व किंचितसे मीठ. ह्या बरणीचे तोंड पातळ कापडाने बंद केले जाते व हि बरणी उन्हात ठेवली जाते, उन्हाने हि साखर वितळते व कोकणच्या सालांचा रस व अर्क त्यात उतरतो. अशा प्रकारे घट्ट असा कोकमाची रस तयार. होतो, साधारणतः १ महिना हि बरणी रोज उन्हात ठेवली जाते, नंतर घरामध्ये ठेवली जाते. गरजेप्रमाणे त्यातील रस काढून सरबत बनवले जाते.

सोलकढी – कोकमाची “सोलकढी” तर कोकणची शान आहे जी आजकाल सगळीकडे हॉटेल्स मध्ये सुद्धा उपलब्ध असते. कितीही जास्त किंवा जड जेवणानंतर एक पेला सोलकढी प्यायची कि जेवण हमखास पचायला सोपे जाते. पण अस्सल सोलकढी चा स्वाद घ्यायचा असेल तर अलिबागसारख्या ठिकाणी नक्की यावे. सुकवलेल्या कोकमाच्या सालींचा रस काढला जातो, व त्यात ओल्या नारळाच्या खोबऱ्याचा रस काढून टाकला जातो, नंतर चवीप्रमाणे साखर मीठ, जीरे, कोथिंबीर, इ. टाकले जाते व सोलकढी तयार .

कोकम सरबत, सोलकढी सोबतच कोकमाचा उपयोग जेवणात आमसूल म्हणून सुद्धा केला जातो. कोकमाची साले मीठ लावून उन्हात सुकवली जातात व हे आमसूल जेवणात वापरले जाते. कोकमाचे बरेच औषधी गुणधर्मे आहेत. मुख्य उपयोग म्हणजे हे पित्तनाशक आहे . तसेच जेवण पचण्यासाठी सुद्धा मोठा उपयोग होतो. शरीरातील ऍसिडिटी कमी करते.

असे हे बहुगुणी कोकम म्हणजे कोकणचा मेवाच

शास्त्रीय नाव – Garcinia indica

प्रचलित नाव  – kokum , कोकम

हंगाम  – उन्हाळा

औषधी गुणधर्मे –

  • आम्लता कमी करण्यासाठी
  • पचन सुधारण्यासाठी
  • मधुमेहींसाठी फायदेशीर
  • वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते
  • तुमचा मूड वाढवू शकतो
  • 181
  • Fruits
  • Comments Off on कोकम

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password