About Alisa Noory
रायगडच्या या भूमीने मौर्य, सातवाहन, क्षत्रप, त्रैकूटक, कलचुरी, कोकण मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव , बहमनी, गुजरातचे सुलतान, अहमदनगरची निजामशाही, पोर्तुगीज, सिद्धी, मराठे, मुघल, आंग्रे, आणि ब्रिटिश या १९ राजवटी पहिल्या आहेत. याच सर्व राजवटींची साक्ष देणाऱ्या वास्तू , घटना, परंपरा व इतर काही ऐतिहासिक गोष्टींचा हा आढावा.
Visit WebsiteBene Israeli Jews of Alibag
अलिबाग परिसरामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये इतिहासात साधारणतः १९ वेगवेगळ्या राजवटींनी राज्य केले. या राजवटींपैकी काही भारतातील तर काही परदेशी सुद्धा होत्या. या राजवटींशिवाय इतरही काही परदेशी नागरिक येथे वास्तव्यास आले. त्यातील एक महत्वाचे म्हणजे ज्यू अर्थात बेने इस्रायली. अलिबाग आणि ज्यू अर्थात बेने इस्रायल यांचे एक अतूट नाते आहे. अलिबाग ...
रामदास बोट दुर्घटना
मुंबई ते रेवस जलवाहतूक फार पूर्वीपासून चालू आहे. आजसारख्या वेगानं चालणाऱ्या रो रो सारख्या सेवा तेव्हा नव्हत्या, पण रामदास सारखी महाकाय बोट होती, ती सुद्धा परदेशी बनावटीची. अलिबाग आणि कोकणातील बरेच लोक कामधंद्यासाठी मुंबईला जात. त्यामध्ये काही नित्यनेमाने व्यापारासाठी जाणारे लोक असत. तर काही आपल्या नातेवाईकांकडे जाणारे असत. दि १७ ...
रहाट
कोकणातील गर्द हिरव्या परळी पोफळीच्या वाड्या, आणि एक खास वैशिष्ट्य म्हणजे घरामागील विहिरीवर असलेला रहाट. रहाट प्रत्यक्ष पाहिलेली पिढी आज ४० -४५ च्या वरच्या वयाची. पण त्यांनीच खरी कोकणाची मजा घेतलेली. आजकाल इलेक्टिक मशीन च्या जमान्यात हे पारंपरिक रहाट दिसेनासे झालेत. आणि ती खिल्लारी बैलजोडी सुद्धा दुर्मिळच.पाऊस संपला कि वाड्यांना ...
पहिला मराठी शिलालेख
आक्षी हे अलिबागपासून दक्षिणेला सुमारे पाच किमी वर वसलेले आणि नारळी पोफळीच्या बागांनी वेढलेले खेडे. आलिबाग मुरुड रस्त्यावरून जाताना आक्षी हे गाव दिसते. आक्षी गावाला फार मोठा एतिहासिक वारसा लाभला आहे. गावाच्या प्रवेश द्वाराजवळ असलेल्या प्राचीन स्तंभामुळे हे गाव ऐतिहासिक असल्याची खात्री पटते. या परिसरात कोकण शिलाहारवंशीय नृपती केशिदेवराय यांचा ...
इतिहासाचे मुकसाक्षीदार
अलिबागला हजारो वर्षांचा इतिहास असल्यामुळे येथे अनेक शिलालेख, वीरगळ, गधेगळ, तसेच सतीशिळा सापडतात. ह्या सर्वच कलाकृती त्या त्या काळाचा इतिहास सांगतात. काही चित्र स्वरूपातील तर काही लेख स्वरूपातील, पण ह्या प्रत्येक कलाकृतीमध्ये शेकडो कदाचित हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास कोरला आहे. अशा ह्या इतिहासाच्या मुकसाक्षीदार शिळा, ह्यांचा घेतलेला छोटासा आढावा – Visit ...
अलिबागी रुपया
अलिबाग हे आंग्रेकालीन अष्टागारातील एक प्रमुख आगार होते. आणि आंग्रे यांचे आरमाराचे प्रमुख ठिकाण, अर्थातच येथून व नजीकच्या चौल बंदरातूल मोठा व्यापार चाले. पुढील काळात इंग्रज सुद्धा येथे आले. अर्थातच प्रत्येकाने आपापले चलन अस्तित्वात आणले. आंग्रे शासनाची स्वतंत्र टांकसाळ होती. टांकसाळ म्हणजे चलनी नाणी पाडण्याचे ठिकाण. ब्रिटिश चलन रूढ होण्यापूर्वी ...