Search
Sign In

मत्स्य शेती

मत्स्य शेती

समुद्रात होणाऱ्या मासे मारी सोबत वाढती मागणी लक्षात घेऊन पेण आणि अलिबाग परिसरात खाऱ्या पाण्यात व गोड्या पाण्यात अंधुनिक पद्धतीने मत्स्य शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. समुद्रातील खारे पाणी खाडी परिसरात तळी करून साठवले जाते व त्यात उत्कृष्ट अशी मत्स्य बीजे टाकली जातात व तिथे मोठ्या प्रमाणावर मासे पाळले जातात. हाच प्रयोग गोड्या पाण्याच्या कृत्रिम तलावात हि केला जात आहे. अलिबाग व पेण परिसरात खारपट जमीन असल्यामुळे गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीला चांगला वाव आहे. नैसर्गिक अनुकुल वातावरणा मुळे माशांची पैदास इथे चांगली होते. त्यामुळे शेती व्यवसाया इतकाच मत्स्य शेती व्यवसाय इथे प्रमुख झाला आहे. 

पुणे मुंबई सारखी शहरे जवळ असल्या मुळे व तिथे माशांना चांगली मागणी असल्यामुळे इथल्या माशांना चांगला भाव मिळतो. त्यामुळे आर्थिक प्रगती साठी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर अलिबाग व आसपासच्या परिसरात केला जातो. कृत्रिम तलाव करून त्यात मत्स्य शेती करणे हा आता येथील स्थानिकांचा प्रमुख कुटीर उद्योग झाला आहे. या व्यवसायला महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास मंडळा कडून या व्यवसायास प्रोत्साहन व अर्थ सहाय्य मिळत आहे. अलिबाग जवळील पोयनाड, शहाबाज परिसरात अनेक शेतकरी पारंपारिक शेती सोबत हा जोड व्यवसाय करीत आहेत. या खारवट  जमिनीतील गोड्या पाण्यात जिताडा , रोहू, तिलापिया, कटला या जातीच्या माशांची मोठ्या प्रमाणावर पैदास होते. जिताडा हा मासा अतिशय चविष्ट असून या माशाला खवैय्यांची चांगली पसंती असल्यामुळे त्याला मागणी हि चांगली आहे. 

वाढता व्यवसाय

या व्यवसायासाठी महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास मंडळ अर्थ सहाय्य करते. खोपोली येथील शासकीय मत्स्य बीज केंद्रातून मस्त्य बीज पुरवले जाते तसेच व्यवसायास मार्ग दर्शनही केले जाते त्यामुळे स्थानिक शेतकरी या व्यवसायात गुंतला आहे. हा व्यवसाय अधिक वाढावा आणि यात सुधारणा व्हावी म्हणून अलिबाग येथे मत्स्य व्यवसाय विकास मंडळा तर्फे प्रशिक्षण केंद्रही उभारले जाणार आहे याचे भूमिपूजन झाले असून लवकरच ते तयार होईल व स्थानिक तरुणांना जास्तीत जास्त या क्षेत्रात प्रशिक्षण घेऊन नवे प्रयोग करता येईल व आर्थिक प्रगती करता येईल.

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password