Search
Sign In

शेवग्याच्या फुलांची भाजी

शेवग्याच्या फुलांची भाजी

मंडळी तुम्ही सगळ्यांनी शेवग्याच्या शेंगांची भाजी किंवा शेंगा डाळीमध्ये टाकून नक्कीच खाल्या असतील. डाळीमध्ये तर एखादी शेवग्याची शेंग फार छान चव आणते. पण ह्याच शेवग्याच्या फुलांची सुद्धा छान चवदार भाजी करता येते हे तुम्हाला माहिती आहे का ? आज आपण ह्याच शेवग्याच्या फुलांच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य – 

  • शेवग्याची फुले (२ कप )
  • बारीक चिरलेला कांदा १ कप
  • ४ पाकळ्या ठेचलेला लसुण
  • हळद , हिंग , मोहोरी, घरगुती मसाला
  • तेल, गूळ, मीठ
  • खोवलेला ओला नारळ, कोथिंबीर

कृती –

शेवग्याची फुले बारीक चिरून घेणे. कढईमधे तेल गरम करून, मोहोरी टाकावी, ती तडतडल्यानंतर लसूण आणि कांदा घालून चांगले परतून घ्यावे. कांदा गुलाबी झाल्यानंतर त्यामध्ये हिंग, हळद, मसाला घालून परतावे. व त्यामध्ये बारीक चिरलेली शेवग्याची फुले टाकावी. वरून थोडे पाणी शिंपडावे व एकत्र मिक्स करावे. त्यावर झाकण ठेवून १० ते १५ मिनिटे शिजू द्यावे. मध्ये मध्ये हे मिश्रण ढवळावे. गरजेनुसार पाणी शिंपडावे. भाजी शिजल्यावर त्यावर ओले खोबरे व कोथिंबीर टाकावी.

अशा प्रकारे चवदार शेवग्याच्या फुलांची भाजी तयार.

शेवग्याच्या फुलांमधील औषधी गुणधर्मे –

शेवग्याची फुले अँटिऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात आणि हाडांच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट ठरू शकतात.

शेवग्याच्या फुलांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण लक्षणीय असते जे उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित इतर समस्यांवर  उपयुक्त ठरू शकते.


पाककृती सौजन्य – सौ रुपाली शिंपी सासवडकर

  • 29
  • Veg-Food Recipes
  • Comments Off on शेवग्याच्या फुलांची भाजी

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password