Search
Sign In

संस्कृती

अलिबाग, रायगड, जवळ जवळ १८ ते १९ राजवटीचे वास्तव्य अनुभवलेले. त्याचबरोबर वेगवेगळ्या परंपरा येथे वसलेल्या. खाली दक्षिणेला असलेल्या तळकोकणाची तर वर उत्तरेला असलेल्या मुंबईची छाप अलिबागवर पडलेली आणि त्यातूनच बहरलेली येथील संस्कृती आणि परंपरा. विविध धर्मीय लोक येथे फार पूर्वीपासून राहत असल्यामुळे सर्वधर्मीय परंपरा येथे आढळतात.

Visit Website

About Alisa Noory

Culture @Alibag

सांस्कृतिक वारसा

अलिबाग आणि परिसरातील अनेक बौद्धकालीन लेणी तसेच शिलालेख, ताम्रपट येथील सांस्कृतिक वारसा दर्शवितात. फार पूर्वीपासून शिक्षणाचा प्रसार, वैज्ञानिक प्रगती, तसेच दळणवळणाच्या साधनातील झालेल्या वाढीमुळे सांस्कृतिक देवाणघेवाण सुद्धा बरीच झाली. शिवाजी महाराज व आंग्र्यांच्या काळात बऱ्याच मंदिरांचे बांधकाम व जीर्णोद्धार झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ साली बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यावर येथे सुद्धा प्रसार झाला. यहुदी धर्माचे अनुयायी असलेले बेणे इस्त्राईल इ. स. सहाव्या शतकात भारतात आले असावेत. त्यांचे प्रार्थनास्थळे सिनेगॉग येथे आढळतात. जिल्ह्यामध्ये मुस्लिम सुद्धा बऱ्याच प्रमाणात वास्तव्यास आहेत. रायगड जिल्ह्याला अनेक थोर समाजसुधारक व विचारवंतांचा सुद्धा वारसा लाभला आहे. या विचारवंतांनी लिहिलेले अनेक धार्मिक ग्रंथ याची साक्ष देतात.

Visit Website

About Alisa Noory

Art @Alibag

साहित्य व कला

मराठी लेखनकलेला अलिबागजवळील काही शिलालेखांमुळे फार प्राचीन वारसा लाभला आहे. अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील नऊ ओळींचा शिलालेख शके ९३४ म्हणजेच इ. स. १०१२ मधील मराठीतील सर्वात पहिला शिलालेख मानला जातो. शिलालेखांप्रमाणेच पहिल्या ताम्रपटाचा मान हा रायगड जिल्ह्यालाच मिळतो. नंतरच्या काळात समर्थ रामदासांनी लिहिलेला श्री दासबोध ग्रंथ सुद्धा रायगड जिल्ह्यातील शिवथरघळीतला. आंग्रेकालीन अष्टागारातील प्रमुख ठिकाणे अलिबाग आणि परिसरात असल्यामुळे येथे शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले गेले. याच काळात मराठी भाषेचा कोश, मराठी व्याकरण व इतर पाठ्यपुस्तकांची निर्मिती झाली. मराठा आणि पेशव्यांच्या काळात नागाव व पेण हि विद्येची केंद्रे होती. नंतरच्या स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक शालेय पाठ्यपुस्तके, बोधप्रत पुस्तके, प्रबंध, वर्तमानपत्रे, अशा अनेक प्रकारच्या साहित्याने येथील साहित्य व ग्रंथसंपदा बहरलेली आहे.

Visit Website

About Alisa Noory

Salt Pans @Alibag

पारंपारिक व्यवसाय व उद्योगधंदे

प्राचीन काळी मीठ निर्मिती व कुटिरोद्योग हे प्रमुख व्यवसाय होते. अलिबागजवळील चौल हे प्रसिद्ध व विकसित बंदर होते. तसेच मुंबईतील काही बंदरे, मुरुड कडे राजपुरी इत्यादी बंदरे होती व येथून आंतरराष्ट्रीय व्यापार चाले. उद्योगधंद्यांच्या इतिहासातील उल्लेखनीय बाब म्हणजे शिवाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्यात गलबते बांधण्याचा कारखाना काढला होता. मुघल व पोर्तुगीज काळापासून रेवदंडा व चौल येथे रेशमी कापडचा व्यवसाय चाले. नंतर स्वातंत्र्यपूर्व काळात येथे औद्योगिकरणाने बरेच उद्योग व्यवसाय सुरु झाले. पुढे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व इतर वित्तीय संस्थांकडून अधिक मदत मिळाल्याने बरेच उद्योग विकसित झाले. पेणच्या मातीच्या व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सुंदर व सुबक मूर्ती तर जगप्रसिद्ध आहेत, येथे वर्षातून ६ ते ८ माहिने रोजगार उपलब्ध असतो.

पारंपारिक व्यवसाय

About Alisa Noory

पर्यटन संस्कृती

इ. स. च्या पूर्वीपासून चौल हे बंदर आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी प्रसिद्ध बंदर व समृद्ध शहर होते, त्यामुळे येथे विविध देशांतून प्रवासी व्यापारासाठी व इतर कारणासाठी येत. चौल बंदरातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात मालाची आंतरराष्ट्रीय देवाण घेवाण होत असे. सन १५८३ मध्ये एका डच प्रवाशाने चौलचे वर्णन तटबंदी असलेले चांगले बंदर व व्यापारासाठी प्रसिद्ध शहर म्हणून केले आहे. रशियन प्रवासी अथनासीयस निकीतीन याने १४७० मध्ये चौल रेवदंडा येथे भेट दिली होती. असे अनेक प्रवासी येथे येऊन गेले व त्यांनी येथील प्रवास वर्णन लिहून ठेवले आहे. अलिबाग जवळ कनकेश्वरच्या डोंगरावर, तसेच अक्षी समुद्रकिनारा, फणसाड अभयारण्य येथे बरेच पक्षी निरीक्षक आवर्जून भेट देतात. येथील निसर्गसौंदर्य जवळपासच्या पर्यटकांना आकर्षित करते. येथे मोठ्या प्रमाणात किल्ले, पुरातन वास्तू, प्राचीन मंदिरे व इतर प्रार्थनास्थळे, असल्याने येथे पर्यटन मोठ्या प्रमाणात विकसित झालेले आहे.

अलिबागचे पर्यटन
Reference : Raigad Gazeeteer

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password