Search
Sign In

नारळाच्या दुधातील शेवया

नारळाच्या दुधातील शेवया

अलिबागचे वैशिष्ट्य असलेल्या नारळ आणि तांदूळ यापासून बनविण्यात येणारा हा अजून एक गोड पदार्थ. साधारणतः नारळी पौर्णिमा किंवा दहीहंडी या उत्सवांच्या दिवशी हा पदार्थ घरोघरी बनवला जातो. नारळ आणि तांदूळ हे फार पूर्वीपासून येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यामुळेच फार पूर्वीपासून हा पदार्थ येथे बनवण्यात येतो. पांढऱ्याशुभ्र तांदुळाचे पीठ व ताज्या नारळाचे दूध यांची चव एकत्रपणे आपल्याला या पदार्थामध्ये घेता येते.

सर्वप्रथम ताजा नारळ फोडून त्याचे खोबरे काढले जाते, नंतर त्यामध्ये पाणी टाकून त्याचे दूध काढले जाते. त्यामध्ये किसलेला गूळ, वेलची पूड टाकली जाते व हे दुष्ट तयार होते.
नंतर तांदळाच्या पिठाची उकड काढली जाते. यामध्ये उकळलेले पाणी आणि तांदळाचे पीठ समप्रमाणात मिसळले जाते. नंतर या पीठाचे माध्यम आकाराचे गोळे केले जातात. हे गोळे नंतर उकळत्या पाण्यात टाकून शिजविले जातात. या पाण्यात हळदीची पाने टाकली तर छान सुवास येतो. हे पीठाचे गोळे पाण्यावर तरंगू लागल्यावर ते पूर्णपणे शिजले असे समजावे. नंतर या पिठाच्या माध्यम आकाराच्या शेवया पाडाव्यात. ह्या गरमागरम शेवया नारळाच्या दुधासोबत खाताना फार चवदार लागतात.

  • 246
  • Food , Special Food
  • Comments Off on नारळाच्या दुधातील शेवया

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password