Search
Sign In

फांद्यांचे ताडाचे झाड

फांद्यांचे ताडाचे झाड

निसर्ग आपल्या सभोवताली ज्या गोष्टी निर्माण करतो त्यावर त्याचेच अधिपत्य असते. आणि निसर्गाचे सुद्धा काही नियम असतात ज्या नियमांमध्ये अखंड सृष्टी चालत असते. परंतु कधी कधी या निसर्गनियमांना सुद्धा अपवाद असलेले आपल्याला पाहायला मिळतात. अशातलेच एक झाड म्हणजे नारळाचे किंवा तत्सम जातीचे, अशा प्रकारच्या झाडाची रचना म्हणजे लांब सडक खोड आणि टोकाला पर्णसंभार. अशा झाडांना शक्यतो फांद्या नसतात. परंतु अलिबाग परिसरात २ अशी झाडे आहेत कि या झाडांना प्रचंड प्रमाणात फांद्या आढळतात आणि म्हणून हि झाडे दुर्मिळ आहेत.

असेच एक ताडाचे झाड अलिबाग जवळील नागाव च्या समुद्रकिनाऱ्यावर दिसते, अगदी समुद्रालगत हे झाड उभे आहे. आणि या झाडाला साधारणतः ४० ते ५० फांद्या दिसून येतात. असेच दुसरे झाड अलिबाग पासून रेवस रस्त्याला विद्यानगरच्या पुढे रस्त्यालगत दिसून येते, या झाडाला सुद्धा साधारणतः ३० ते ३५ फांद्या दिसून येतात.

हि झाडे फार जुनी असून यांचे संवर्धन करणे महत्वाचे आहे.

  • 212
  • Natural Wonders
  • Comments Off on फांद्यांचे ताडाचे झाड

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password