डॉ. सलीम अली - भारतातील प्रसिद्ध पक्षी निरीक्षक व 'Birdman of India ' या नावाने ओळखले जाणारे डॉ. सलीम अली हे अलिबाग जवळील किहीम या गावी मुक्कामास होते. येथे त्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात पक्षांचा अभ्यास करायला मिळाला. त्यांची पक्षी निरीक्षणावरील बरीच पुस्तके प्रसिद्ध आहेत. लवकरच किहीम येथे मोठे पक्षी संग्रहालय उभारण्यात येणार आहे.
Visit Website
कनकेश्वर –
कनकेश्वराचा उंच डोंगर, व जवळच असलेला अथांग समुद्र, तसेच आजूबाजूला असलेले डोंगर, यामुळे येथे अनेक जातीचे पक्षी वास्तव्यास असतात. देशी विदेशीचे पक्षी अभ्यासक येथे आवर्जून पक्षी निरीक्षणास येतात. तीन बाजूला असलेले डोंगर व गर्द झाडी आणि त्यामुळे असलेले थंड वातावरण पक्ष्यांना आकर्षित करतात. कनकेश्वर मंदिराकडे जाताना आपल्याला हमखास या पक्षांचा सुमधुर किलबिलाट कानी पडतो. येथे बऱ्याच प्रमाणात फोटोग्राफेर्स सुद्धा पक्ष्यांची छायाचित्रे काढण्यास येतात.
कनकेश्वर पहाआक्षी समुद्रकिनारा –
जगभरातील अनेक स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांसाठी हे अत्यंत आकर्षक ठिकाण आहे. दरवर्षी पक्षी प्रेमी या समुद्र किनार्याला भेट देतात आणि तेथील पाहुण्या पक्षांच्या प्रतिमा आपल्या कॅमेऱ्यात टिपतात. ज्यात प्लेव्हर, सीगल्स, टेरन्स आणि बार टेल , गोडविट यांचा समावेश आहे.
आक्षी समुद्रकिनाराफणसाड अभयारण्य –
निसर्ग विविधतेने नटलेल्या अलिबाग मध्ये मोलाची भर घालते ते म्हणजे फणसाड येथील अभयारण्य . येथे अनेक प्रकारच्या पक्ष्यांच्या प्राण्यांच्या प्रजाती पाहावयास मिळतात . पक्ष्यांच्या तर जवळ जवळ १६० प्रजाती येथे आढळतात. साधारणतः ७००० हेक्टर परिसरात असलेले हे अभयारण्य म्हणजे येथील पक्ष्यांसाठी असलेले वरदानच. फार लांबून पक्षी निरीक्षक व पक्षीप्रेमी येथे पक्षी निरीक्षणासाठी व छयाचित्रणासाठी येतात
फणसाड अभयारण्य