Search
Sign In

अलिबागी रुपया

अलिबागी रुपया

अलिबाग हे आंग्रेकालीन अष्टागारातील एक प्रमुख आगार होते. आणि आंग्रे यांचे आरमाराचे प्रमुख ठिकाण, अर्थातच येथून व नजीकच्या चौल बंदरातूल मोठा व्यापार चाले. पुढील काळात इंग्रज सुद्धा येथे आले. अर्थातच प्रत्येकाने आपापले चलन अस्तित्वात आणले. आंग्रे शासनाची स्वतंत्र टांकसाळ होती. टांकसाळ म्हणजे चलनी नाणी पाडण्याचे ठिकाण.

ब्रिटिश चलन रूढ होण्यापूर्वी जिल्ह्यात आंग्रे शासनाचा जुना कुलाबा रुपया, त्यानंतरचा नवीन जंजिरा – कुलाबा रुपया आणि अलिबागचा तांब्याचा पैसा अस्तित्वात आला . जुन्या कुलाबा रुपयावर पर्शिअन अक्षरे होती. स न १८८२ पासून उपरोक्त नाणी चलनातून जाऊन ब्रिटिश नाणी प्रामुख्याने चलनात आली. इ स १८४२ मध्ये १०० ब्रिटिश रुपयांची किंमत ८८. ६ अलिबाग रुपये अशी होती. अर्थात अलिबागी रुपया जास्त किमतीचा होता. हा अलिबागी रुपया १७१.६४ गुंजाएवढा असे. गुंज म्हणजे डोंगराळ भागात सापडणाऱ्या एका वेलीचे बी. भडक गुलाबी व काळ्या रंगाचे हे बी साधारणतः १ ग्राम वजनाचे असते. १० गुंज म्हणजे १  तोळा असा हिशोब असे. इ स १८५० मध्ये अलिबागी रुपयाचे  वजन १७६.९६ गुंजाएवढे झाले व १०० ब्रिटिश रुपयांची किंमत ८७. अलिबागी रुपये झाली.

सर्वात आधी पर्शिअन लिपीतील जुना कुलाबा रुपया  झाला. त्यानंतर प्रदिद्ध झालेल्या अलिबागी  दोन्ही बाजूस मराठीत “श्री” अक्षर कोरण्यात आले. ईस्ट इंडिया कंपनीने लहान सहन संस्थानिक व सरदारांच्या चलनावर बंदी आणली व जंजिरा – कुलाबा रुपयाचे नाणे प्रसारात आले. एकोणिसाव्या शतकाअखेर सर्व जुन्या चलनाची जागा ब्रिटिश चालनाने घेतली.

संदर्भ – रायगड गॅझेटिअर

  • 365
  • Historical
  • Comments Off on अलिबागी रुपया

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password