अलिबाग ! निसर्गाच्या सानिध्यातील एक नयनरम्य ठिकाण. ऐतिहासिक वारसा व नैसर्गिक विविधतेने नटलेले. अलिबाग जवळील चौल हे महत्वाचे बंदर इतिहासकाळात फार प्रसिद्ध असल्याने फार पूर्वीपासून येथे देशी विदेशी पर्यटक, व्यापारी, राज्यकर्ते यांचे लक्ष वेधून घेणारा प्रदेश. अलिबागपासून मुंबई हे महत्वाचे ठिकाण जवळ असल्याने ह्या ठिकाणाला अजून जास्त महत्व प्राप्त झाले.
Visit Websiteअलिबागचा प्रदेश आणि प्रवासी यांचा एक अतुट संबंध आहे. तसेही भारतात प्राचीन काळापासून अनेक जण वेगवेगळया कारणासाठी येत गेले. कोकण किनारपट्टी तर या प्रवाशांची अत्यंत लाडकी होती. अनेक कारणासाठी हे प्रवासी येत असत. नवीन भू प्रदेश बघण्यासाठी, नोकरी साठी, लढण्यासाठी, व्यापारासाठी, धर्म प्रचारासाठी, शिकण्यासाठी असे हे प्रवासी येत राहिले.
काही कथा या बाबत सांगितल्या जातात त्या प्रमाणे बेने इस्त्रायल लोकांना याच प्रदेशाने २२०० वर्षांपूर्वी आश्रय दिला. येथील स्थानिक चालीरीती स्वीकारत पण स्वतःचा धर्म सांभाळत हे लोकं आजही या प्रदेशाबद्दल अस्था बाळगून आहेत. व्यापारा निमित्त अनेक जण येथे आले. त्यातील खत्री, परदेशी आणि तशाच जातीचे अनेक जण भारताच्या उत्तरेकडून तसेच आत्ताच्या पाकिस्तानातून खुप आधीच येथे येऊन स्थायिक झाले. याचा पुरावा म्हणजे हिंगुलाजा मातेचे स्थान जे चौलच्या डोंगरावर आहे. काही पोर्तुगीज ख्रिस्ती लढण्यासाठी, व्यापारासाठी येथे उतरले आणि काम करताना धर्म प्रचारही केला. आजही कोरालाई येथे यांचे वंशज बघायला मिळतात.
व्यापारा निमित्त आणि धर्म प्रसारासाठी बौध्द भिक्षु याच भागात येऊन राहिले. यांची काही प्राचीन लेणी चौल भागात तसेच मुरुड येथे कुडा मांदाड येथे बघायला मिळतात. याच बरोबर मग अरब, हबशी (अबेसेनियन), मुघल, इंग्रज, फ्रेंच अशी कितीतरी देशा धर्माचे लोक येथे येत गेले. काही प्रवासी म्हणुन येऊन परत गेले तर काही येथील लोकांमध्येच राहिले.
अगदी अलीकडच्या काळात, अलिबागचा निसर्ग पर्यटकांना आकर्षित करू लागला आणि मुंबई व पुणे या मोठ्या शहरांपासून जवळ असल्यामुळे इथे पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली. “मिनी गोवा” म्हणून अलिबाग प्रसिद्ध झाले. एक दिवसाच्या सहलीसाठी सुद्धा इथे मुंबई आणि पुण्याच्या पर्यटकांची गर्दी वाढू लागली. येथील निसर्ग संपन्नता, ऐतिहासिक वास्तू, गड किल्ले, प्राचीन मंदिरे, डोंगर दऱ्या, सुंदर समुद्रकिनारे, दर्जेदार खाद्यसंस्कृती, म्हणजे जणू पर्यटकांसाठी एक पर्वणीच. परंतु जास्तीत जास्त पर्यटक येथे समुद्रकिनारे पाहण्यासाठी व येथील विविध प्रकारचे मासे खाण्यासाठी येतात. अलिबागचे खरे स्वरूप बऱ्याच पर्यटकांना माहिती नसल्याने हि सर्व ठिकाणे पाहण्यापासून ते वंचित राहतात.
या पोर्टल च्या माध्यमातून आम्ही सर्वांना सांगू इच्छितो कि अलिबाग म्हणजे फक्त समुद्रकिनारे व मासे एवढे मर्यादित नसून –
- शिवकालीन आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या शौर्यपटलाची गाथा म्हणजे अलिबाग
- पूर्व किनारपट्टीवर राज्य व शत्रूंना वचक बसवण्यासाठी बांधण्यात आलेले, शेकडो वर्षे ऊन वारा, समुद्री लाटांचा मारा खात तरीही दिमाखात उभे असलेले पद्मदुर्ग म्हणजे अलिबाग.
- शालिवाहन काळापासून उत्तम कलेची व विविध राजवटीची साक्ष देणारी प्राचीन मंदिरे म्हणजे अलिबाग.
- ठिकठिकाणी सापडणारे कोरीव शिलालेख, शालिवाहन काळापासून उत्तम कलेची व विविध राजवटीची साक्ष देणारी प्राचीन मंदिरे म्हणजे अलिबाग.
- नारळी पोफळीच्या हिरव्यागार वाड्याचे व फणस, कोकम, जांभ, करवंदे, ताडगोळे, आंबा अश्या चवदार फळांचे माहेरघर म्हणजे अलिबाग.
- आंतरराष्ट्रीय स्तरावर GI मानांकन मिळवलेल्या जगप्रसिद्ध चवदार पांढऱ्या कांद्याचे माहेरघर म्हणजे अलिबाग
- विविध परंपरा सण उत्सव दिमाखात साजरे करणारे व अत्याधुनिक काळातही आपली संस्कृती जपणारे शहर म्हणजे अलिबाग.
- विविध ऋतूंमध्ये निसर्गाची मुक्त उधळण करून सजवलेला साज म्हणजे अलिबाग.
अलिबागसाठी अभिमानाचे क्षण
अलिबागची दखल राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर
Three Tourist destinations
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धन या तीन पर्यटन स्थळांना ‘ब’ श्रेणीचा दर्जा देण्यात आला आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी, 15 फेब्रुवारी 21 रोजी ही घोषणा केली. मुंबई आणि पुण्याच्या जवळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील या पर्यटन स्थळांच्या विकासाला महत्त्व देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.Alibag on Trivago
पर्यटकांना सुरक्षित असे ठिकाण म्हणून जगातील १०० शहरांची निवड Trivago या संकेतस्थळाने केली आहे. भारतातील निवड झालेल्या ५ शहरामणध्ये अलिबागचा समावेश आहे. अलिबागला प्राप्त झालेल्या नैसर्गिक सुबत्तेसह शहराला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पर्यटकांना हे नैसर्गिक सौंदर्य जसे भुरळ घालते तसेच ऐतिहासिक वस्तू सुद्धा आकर्षित करतात. याची नोंद Trivago ने घेऊन अलिबाग शहराची निवड केली आहे, याचा सर्व अलिबागकारांना नक्कीच अभिमान आहेअलिबागमधील प्रसिद्ध ठिकाणे
अलिबागमधील प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाणे पहा
अलिबागला भेट देणार आहात ?
तुमच्या भेटीचे उत्तम नियोजन करण्यात आम्ही मदत करतो. आमचे तयार टूर मार्गदर्शक पहा जे तुम्हाला मदत करू शकतात.