About Alisa Noory
अलिबाग म्हणजे मत्स्यप्रेमीचे आवडते ठिकाण, मासेमारी हा व्यवसाय अलिबाग आणि परिसरात पिढ्यानपिढ्या पासून चालत आलेला. पश्चिमेला असलेला अथांग समुद्र व मासेमारीसाठी असलेले पोषक वातावरण ह्यामुळे येथील मासेमारी व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अलिबाग येथे ठिकठिकाणाहून पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यासाठी व मासे खाण्यासाठी येतात. समुद्राजवळ असलेला कोळी समाज मासेमारीच्या व्यवसाय करतात. अलिबाग आणि परिसरात अनेक बंदरे आहेत जिथे मासेमारीच्या बोटी येतात व येथूनच लाखो रुपयांचा माल इतर ठिकाणी वाहतूक केला जातो. कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा व विविध प्रकारच्या माश्यांची उपलब्धता यामुळे कोकणातील खाद्यसंस्कृतीमध्ये माश्यांचा फार मोठा वाटा आहे. या मत्स्यसंस्कृतीला जोड मिळालीय ती कोकणातील विविध प्रकारच्या मसाल्यांची.
Visit Websiteअलिबागच्या समुद्रामध्ये वेगवेगळ्या दिवसांत वेगवेगळे मासे सापडतात. येथे साधारणतः पापलेट, कोळंबी, सुरमई, रावस, जिताडा, इ. प्रकारचे मासे जास्त प्रमाणात सापडतात. या आणि अश्या बऱ्याच माश्यांमध्ये बरीच जीवनावश्यक घटक जसे कॅल्शियम, जीवनसत्वे, प्रथिने आणि ओमेगा ३, कार्बोहैड्रेट्स आढळतात. मत्स्यप्रेमींना ह्या जीवनावश्यक गोष्टी अजून प्रोत्साहन देतात. अलिबागला समुद्रकिनारा लाभल्यामुळे स्वच्छ व ताजे मासे येथे फार मोठ्या प्रमाणात मिळतात. याच उपलब्धतेमुळे तसेच वेगवेगळ्या मसाल्यांमुळे येथे पारंपरिक खाद्यप्रकारांसोबत नवनवीन पाककृती सुद्धा प्रचलित होत आहेत.
मासेमारी –
अलिबागला लाभलेल्या अथांग समुद्रामुळे येथे मासेमार म्हणजेच कोळी समाज मोठ्या प्रमाणात मासेमारी करतात. ज्या ठिकाणी समुद्राचे पाणी जमिनीमध्ये जाऊन खाडीसदृश भाग बनतो तेथे मासेमारीसाठी बंदर विकसित होते. व तिथूनच मासेमारीसाठी मोठ्या होड्या निघतात आणि परत येथेच मासे उतरवले जातात. येथूनच मासे स्थानिक बाजारात व वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जातात. या बंदराजवळच कोळी समाजाची वस्ती असते त्याला येथे कोळीवाडा असे म्हणतात. अलिबाग आणि जवळील वरसोली, थळ, तसेच मुरुडकडे – रेवदंडा, थेरोंडा, मुरुड, राजपुरी येथे अशा प्रकारची बंदरे आहेत. मासेमारी करताना पकडलेले चांगल्या प्रतीचे मासे बाजारात पुरवले जातात तर काही छोटे मासे उन्हात सुकवले जातात. हे मासे सुकविण्यासाठी बंदराजवळच मोठी पटांगणे तयार असतात. अशा सुक्या माश्यांना सुद्धा बाजारात खूप मागणी असते.
मत्स्य व्यवसाय –
मत्स्य व्यवसाय हा जिल्ह्यातील मोठा दुय्यम व्यवसाय असून, साधारणतः २४० किमी चा समुद्रकिनारा मासेमारीसाठी उपलब्ध आहे. समुद्र आणि खाड्या लगतची शंभर पेक्षा जास्त गावे या व्यवसायात गुंतलेली आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास ४० मासेमारी केंद्रे आहेत. अलिबाग आणि जवळच्या बंदरातूल पकडलेले मासे येथून महाराष्ट्राच्या वेगवेगळया शहरांमध्ये पुरवले जातात. मोरा -कारंजा, अलिबाग, रेवदंडा, मुरुड आणि श्रीवर्धन हे पाच मासेमारीचे विभाग आहेत. येथे उत्तम प्रतीचे मासे मिळत असल्याने बाजारभाव सुद्धा चांगला मिळतो. बोटीतून पकडून आणलेले मासे येथे विविध प्रकारच्या शीतपेयांमध्ये ठेवले जातात व मोठ्या ट्रक मध्ये भरून इतर शहरांना पुरवले जातात. येथील सुकी मच्छी सुद्धा फार प्रसिद्ध आहे, असे सुकवलेले मासे बऱ्याच प्रमाणात वेगवेगळ्या व्यापाऱ्यांमार्फत इतर शहरांत पाठवतात.अलिबागची खास मत्स्य खाद्यसंस्कृती
चमचमीत, झणझणीत, मसालेदार मासे ! या आणि नक्की आस्वाद घ्या