कोकणातील मेवा म्हणजेच इथली विविध चवदार फळे आणि त्यापासून बनवलेले अनेकविध चवदार पदार्थ. हे पदार्थ खाणाऱ्याच्या जिभेवर ती चव रेंगाळत राहते. पण हि सर्व फळे वर्षातून फक्त काही महिनेच उपलब्ध असतात, आणि खवय्ये वर्षातील इतर महिने ह्या फळांची वाट पाहत असतात. ह्याच विविध फळांपासून काही विशिष्ट पदार्थ बनवले जातात जे वर्षभर टिकून राहतात आणि तीच अस्सल चव आपल्याला वर्षभर देतात. ह्यातीलच काही पदार्थ येथे दिले आहेत.
Visit Websiteआंबापोळी
कोकणातील हापूस आंबा म्हणजे जगप्रसिद्ध चव. आंबा जसा प्रसिद्ध तसेच त्यापासून बनवलेले विविध पदार्थ सुद्धा आवडते. असाच एक पदार्थ म्हणजे आंबापोळी. आंब्याची अस्सल चव आंब्याचा सीझन संपला तरी पुढे काही महिने जिभेवर रेंगाळत ठेवणारी अशी आंबापोळी. गर्द तपकिरी व भगव्या रंगाची’आंबापोळीचा तुकडा जिभेवर ठेवायचा आणि परत मे महिन्यातल्या आंब्याचा सीझन ...
कोकम सरबत
बहुतांशी करून कोकणातच सापडणारे कोकम हे फळ सरबतासाठी मात्र सगळीकडे प्रसिद्ध आहे उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी कोकम सरबत हमखास वापरले जाते. कोकणात, तसेच अलिबागमध्ये सुद्धा कोकमाची झाडे मुबलक प्रमाणात दिसून येतात. हिरवेगार भरगच्च पण उंच असे झाड एप्रिल, मे मध्ये गर्द लाल रंगाच्या कोकमांनी भरून जाते. अलिबाग आणि परिसरात कोकम सरबताची ...