चौलमधून सराई कडे जाण्याच्या रस्त्यावर हिंगुलजा देवीच्या डोंगराच्या नंतर डावीकडे सोमेश्वराचे मंदिर दिसते. येथे नव्याने बांधलेली कमान तुमचे स्वागत करते. समोर मोठा मंडप असून नंतर दोन गोलाकार घुमट असलेले बांधकाम आहे. त्यातील मागील मुख्य घुमटाखाली एक खोलगट गाभारा आहे व त्यालासुद्धा आतल्या बाजूने एक छोटासा घुमट आहे . मंदिराच्या भिंती दीड ते दोन फूट रुंद असून पांढऱ्या चुन्याचा थर दिलेल्या आहेत. मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर दगडामध्ये कोरलेला पुरातन नंदी समोरच दिसतो. व नंतर खोलगट गाभाऱ्यामध्ये शिवपिंडी.
मंदिराबाहेर एक पुरातन दगडी नंदी दिसून येतो. सभामंडपातील नंदी व बाहेरील नंदी यांमध्ये बरेच साम्य आढळते. मंदिराच्या डावीकडे एक मोठा वटवृक्ष असून त्याच्या पायथ्याशी बऱ्याच प्रमाणात पुरातन मूर्ती, पिंडी, दिवे, व इतर वस्तू ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या उजव्या बाजूला एक पुष्करिणी आहे. व तिच्या बाजूला अजून एक वटवृक्ष आहे
सतीशिळा –
मंदिराच्या डावीकडे असलेल्या वटवृक्षाखाली एक सतीशिळा ठेवलेली दिसून येते. कोर्लई येथील सतीशिळा आणि येथील सतीशिळा यांमध्ये बरेच साम्य दिसून येते. वरच्या बाजूला चंद्र सूर्य व मध्यभागी सतीचा हात काटकोनामध्ये कोरलेला दिसून येतो. चौल, सराई परिसराला फार मोठा इतिहास असल्याची हि अजून एक खूण.
असे हे चौल मधील पुरातन मंदिरांपैकी अजून एक नक्की पाहण्यासारखे मंदिर
Nearby Attractions –
How to reach –
- Distance from Alibag – 18 km.
- Mumbai to Murud – 150 km.
- Pune to Murud – 150 km.
- Local transport is available
Amenities
- Bike Parking
- Car Parking