Search
Sign In
Religious Open Now

Shree Vakratunda Ganesh - Hosted By

0

 आवास म्हणजे देवतांचे अस्तित्व असलेले ठिकाण. समुद्रकिनारी वसलेले गाव, केवड्याची बने असलेले गाव. आवासचा उल्लेख स्कंद पुराणामध्ये आहे. कित्येक वर्षांपूर्वी अभिजीत नावाच्या राजाला मूलबाळ नव्हते, तो पत्नीसह पुत्रप्राप्तीसाठी श्री कनकेश्वराच्या डोंगरावर आराधनेसाठी गेला. तेथे त्याने शिवशंकराची उपासना केली, अन त्याला पुत्रप्राप्तीचा वर प्राप्त झाला, नंतर तो वक्रतुंडाची भक्ती करीत आवासमध्येच राहिला. 

श्री वक्रतुंडाची मूर्ती स्वयंभू आहे. समुद्राजवळील केतकीच्या बनामध्ये श्री वक्रतुंडाची मूर्ती गावकऱ्यांना सापडली. त्यांनी या ठिकाणी एक छोटेसे मंदिर बांधले. मूर्तीचा मागील भाग पश्चिमेकडे तर पोटआणि छाती पूर्वेकडे आहे, तर तोंड उत्तरेकडे व थोडेसे वरच्या बाजूला आहे. सोंड ओंकाराप्रमाणे वळलेली आहे.

मंदिर कौलारू असून जुन्या धाटणीचे आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच सुंदर लाकडी नक्षीकाम केलेले आहे. व कीर्ती मुखाजवळ श्री गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. मंदिरामध्ये प्रवेश करताच नक्षीदार लाकडी खांब असलेला सभामंडप दिसतो. आणि सभामंडपाच्या वर एक पोटमाळा. लाकडी खांबांच्या वरच्या बाजूस केलेले फार सुंदर नक्षीकाम लक्ष वेधून घेतात. एका बाजूला वरच्या माळ्यावर जाण्यासाठी लाकडी जिना दिसतो.  सभामंडपाच्या नंतर दिसतो छोटेखानी घुमटाकार गाभारा.  लाकडी मजबूत दरवाज्यातून आत गेल्यावर दिसते श्री वक्रतुंड गणपतीची मूर्ती. मूर्ती पाहिल्यावरच तिच्या पुरातन असल्याची खात्री होते. मंदिरासमोर एक दीपमाळ आहे . मंदिराच्या मागील बाजूस एक बैठे पण मोठाले जुने तुळशी वृंदावन दिसते. व त्याच्या मागील बाजूस एक पुष्करिणी. 

गजांत लक्ष्मी – 

मंदिरासमोर एक गजांत लक्ष्मी चे शिल्प दिसून येते. गजलक्ष्मी ही देवी लक्ष्मीचे एक रूप आहे, जिथे ती हत्तींसोबत दर्शविली जाते. हत्ती हे शक्ती, ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. गजलक्ष्मीच्या मूर्तीत, हत्ती हे लक्ष्मी देवीला अभिषेक करताना दाखवले जातात, ज्यामुळे समृद्धी आणि सुबत्ता वाढते, असे मानले जाते. याचाच अर्थ आवास हे पूर्वीचे समृद्ध गाव असावे असा अंदाज बांधता येतो. 

Amenities

  • Bike Parking
  • Car Parking

Tags

Weather in City :

Working Hours :

Open Now UTC + 5.5
  • Monday08:00 - 19:00
  • Tuesday08:00 - 19:00
  • Wednesday08:00 - 19:00
  • Thursday08:00 - 19:00
  • Friday08:00 - 19:00
  • Saturday08:00 - 19:00
  • Sunday08:00 - 19:00

Nearby Religious Places

Claim listing: Shree Vakratunda Ganesh

Reply to Message

Sign In alibagonline

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password