ऐतिहासिक चौलमधील बऱ्याच पुरातन मंदिरांमधील एक असे श्री कुंडेश्वर असे हे शिवमंदिर. ह्या शिवपिंडीची एक कथा येथील गावकरी सांगतात, पूर्वीच्या काळी हि शिवपिंडी दरवर्षी थोड्या थोड्या आकाराने वाढत असे, असे करता करता, जवळ जवळ ४ ते ५ फूट उंच झाली व नंतर हि वाढ थांबविण्यासाठी कोणीतरी या पिंडीवर एक छोटा खिळा ठोकला नंतर या पिंडीची वाढ थांबली.
येथे जुने कौलारू शिवमंदिर होते, पण ते पडून आता नव्याने लाल चिरा वापरून मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिरासमोर नंदीची मूर्ती असून आत मध्ये गाभाऱ्यामध्ये श्री गणेश आणि हनुमानाची मूर्ती आहे. व नंतर गाभाऱ्यामध्ये शिवपिंडी. मंदिराच्या बाहेर एक पुरातन नंदीची मूर्ती एका बाजूला ठेवलेली दिसते, हि कदाचित पूर्वीच्या काळातील मूर्ती असावी. मंदिरामध्ये जुन्या मंदिराचा फोटो सुद्धा आहे.
मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव हनुमान जयंतीचा उत्सव तसेच श्रावण मासात 14 अध्यायांचे वाचन पारायण केले जाते शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन सुद्धा केले जाते. तसेच प्रतिवर्षी मंडळातर्फे सत्यनारायणाची पूजा आयोजित केली जाते, व येणाऱ्या भाविकांना तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेता येतो.
कसे जाल ?
चौल नाक्यापासून साधारणतः १ ते १.५ किमी अंतरावर हे मंदिर आहे.
- अलिबाग – चौल – १५ किमी
- मुंबई – अलिबाग १०० किमी
- पुणे – अलिबाग १५० किमी
जवळची ठिकाणे –