मुरुड – एक नितांतसुंदर गाव. नारळीपोफळीच्या वाड्यांनी आच्छादलेले. मुरुडमध्ये प्रवेश करतानाच उजवीकडे आपल्याला दिसते ते मुरुड गावची ग्रामदेवता श्री कोटेश्वरी देवीचे मंदिर.
सिद्दीच्या समुद्रातील हालचालींवर नियंत्रण आणण्या साठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुरूडच्या समुद्रात असलेल्या कासा बेटावर “पद्मदुर्ग” हा किल्ला बांधला. कोट म्हणजे किल्ला याच किल्ल्यातील हि देवी म्हणून कोटेश्वरी. नंतर तिचे स्थान मुरुड मध्ये आले. इ. स. १९७० मध्ये मंदिराचा जिर्णोद्धार झाला. वाघावर आरूढ झालेली कोटेश्वरी देवी हे साक्षात तुळजाभवानीचे रुप मानले जाते. मंदिरासमोर नव्याने बांधलेला दीपस्तंभ आहे तर जवळच एक लाकडी खांब उभा केलेला दिसतो. हा खांब पद्मदुर्ग किल्ल्यातील एका खांबाचा भाग असल्याचे बोलले जाते.
नवरात्रीमध्ये कोटेश्वरी देवीचा मोठा उत्सव भरतो, व पूर्व मुरुड गाव व जवळील भक्त देवीच्या दर्शनाला न चुकता येतात. दरवर्षी चैत्र शुद्ध चतुर्दशीला येथे देवीची मोठी यात्रा भरते. देवीची पालखी व मिरवणुक सुद्धा गावामध्ये मोठ्या उत्साहात काढली जाते. या यात्रेनंतर मुरुडमधील इतर यात्रा सुरु होतात.
जवळील आकर्षणे –
Amenities
- Bike Parking
- Car Parking
- Friendly workspace
- Good for Kids