प्राचीन चौल मधील अजून एक पुरातन मंदिर. कोळी समाजाची श्रद्धा असलेली हि देवी भगवती एकवीरा. आजूबाजूला गर्द हिरवीगार झाडे आणि मधोमध मंदिर . मंदिर कौलारू असून आतमध्ये देवीचा गाभारा आहे व समोर नक्षीदार लाकडी खांब असलेला सभामंडप आहे. व त्याच्यावर कौलारू छप्पर. गाभार्याला एक लाकडी दरवाजा सुद्धा आहे. देवीची मूर्ती दगडात कोरलेली आहे. गाभार्याच्या वरील कौलारू छप्पराला थोडीशी जागा सोडण्यात आलेली आहे. मंदिरातील हवा खेळती राहावी हा कदाचित उद्देश असावा.
चौल नाक्यावरून भोवाळे तळ्याजवळ गेले, कि थोडे पुढे जाऊन उजवीकडे जाणारा रस्ता या मंदिराकडे जातो. मंदिराच्या एका बाजूला पोखरण आहे. मंदिरासमोर उंच दीपस्तंभाच्या आकाराचे तुळशी वृंदावन आहे, व बाजूलाच एक चौथरा / झाडाचा पार आहे.
उत्सव – चैत्र महिन्यातील आई एकवीरा देवीची यात्रा असते तेव्हा भगवती देवीजवळ आधी पालखी येते नंतर कार्ला येथील श्री एकवीरा देवीकडे या पालखीचे प्रस्थान होते. ज्या भाविकांना एकवीरा देवीला जायला शक्य होत नाही. ते येथे भगवती देवीच्या दर्शनास येतात.
जवळील आकर्षणे –