Search
Sign In

Papanas (Pomelo)

Papanas (Pomelo)

अलिबाग परिसरात सापडणारे हे एक आंबट गोड चव असलेले फळ.
मोसंबी व संत्र यासारख्या तत्सम प्रजातीतील पण कदाचित सर्वात मोठ्या आकाराचे हे फळ. आकार साधारणतः मोसंबी च्या चार पटीने मोठा. दिसायला अगदी मोसंबी सारखा, पण आतून फिका लाल. मोठ्या रसदार पाकळ्या असलेले. चवीला आंबट गोड.

पावसाळ्यामध्ये पपनीस जास्त प्रमाणात आढळून येतात, गणपतीसमोर असलेल्या फळांमध्ये पपनीसाचे स्थान अढळ असते. बाजारात अशा प्रकारची फळे मोठ्या प्रमाणात विकायला येतात. पपनीस खाताना त्याचे साल काढून सर्व पाकळ्या पहिल्या काढतात व त्यात किंचित साखर आणि काळी मिरी ठेचून टाकली जाते. तेव्हा याचा स्वाद फार छान असतो.

पपनीस मध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात आणि व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्रोत आहे. एक फळ अनेक दिवसांसाठीच्या व्हिटॅमिन सी चा पुरवठा करते, एक शक्तिशाली रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा अँटिऑक्सिडेंट म्हणून हे फळ मदत करते. शरीराचे वजन कमी करण्यास मदत करते, हृदयाची प्रकृती उत्तम ठेवते.

असे हे सिझनल फळ, बहुतांशी कोकण परिसरात मिळणारे फळ. पर्यटकांनी अलिबाग ला आल्यावर नक्की आस्वाद घ्यावा असे बहुगुणकारी व जिभेला पाणी आणणारे फळ नक्की चाखावे.

  • 426
  • Fruits
  • Comments Off on Papanas (Pomelo)

Sign In alibagonline

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password