Search
Sign In

Narali Pornima – Rakshabandhan

Narali Pornima – Rakshabandhan

नारळी पौर्णिमेचे महत्व अलिबाग आणि परिसरातील कोळी बांधवांना जास्त असते. साधारणतः जून आणि जुलै च्या महिन्यामध्ये समुद्र खवळलेला असल्याने समुद्रातील मासेमारी बंद असते. नारळी पौर्णिमेच्या नंतर समुद्र थोडा शांत होतो व या दिवसापासून मासेमारीला पुन्हा सुरुवात होते. मरळीपोर्णिमेच्या दिवशी कोळी समाज समुद्राची यथासांग पूजा करतात व सागराला नारळ अर्पण करून प्रार्थना करतात कि आम्ही आता आमच्या होड्या समुद्रामध्ये पाठवत आहोत त्यांना संरक्षण मिळो व आमचा मासेमारीचा व्यवसाय पुन्हा सुरु होवो.

या दिवशी समुद्रकिनारी बऱ्याच ठिकाणी नारळ फोडण्याच्या स्पर्धा भरविल्या जातात. दोन माणसे समोरासमोर उभी राहून हातामध्ये नारळ घेतात आणि तो एकमेकांच्या नारळावर जोरात आपटतात, ज्याचा नारळ फुटला तो हरला व जो जिंकला त्याला तो नारळ मिळाला. नारळी पौर्णिमेला अलिबागमध्ये बऱ्याच घरांमध्ये नारळापासून विविध खाद्यपदार्थ बनवले जातात. नारळी भात, तांदूळ आणि खोबऱ्याची खीर, नारळाच्या वड्या, नारळाच्या करंज्या, असे विविध पदार्थ घरोघरी बनतात.

रक्षाबंधनासाठी बहिणी भावाकडे येतात व राखी बांधतात. हि राखी साधारणतः गोकुळाष्टमीपर्यंत हातात बांधून ठेवतात. श्रावण महिना आणि मराठी सण यांचे एक अतूट नाते पाहायला मिळते.

  • 339
  • Festivals
  • Comments Off on Narali Pornima – Rakshabandhan

Sign In alibagonline

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password