अलिबाग जवळील एक सुंदर समुद्रकिनारा. अलिबाग पासून १ ते २ किमी अंतरावर वरसोली नावाचे गाव आहे त्यालाच लागून हा किनारा आहे. अलिबागकडून, रामनाथ मार्गे वरसोली येथे जात येते. पूर्णपणे हिरव्यागार मोठमोठया झाडांनी आच्छादलेल्या वरसोली गावातून जाताना आल्हाददायक अनुभव येतो, समुद्रकिनाऱ्यावर जाताना मध्ये वाटेत अनेक पुरातन आंग्रेकालीन मंदिरे पाहावयास मिळतात. हे सर्व पाहत पाहत आपण पोहोचतो ते वरसोलीच्या समुद्रकिनाऱ्यावर. थोडासा खडकाळ असलेल्या किनाऱ्यालगत मोठे सुरूचे बन आहे. किनाऱ्यावरून अलिबागचा कुलाबा किल्ला सुद्धा दिसतो. वरसोली किनाऱ्यावरून चालत अलिबाग किनाऱ्याला जात येते.
पर्यटन –
किनाऱ्यावर पर्यटकांसाठी निरनिराळे वॉटर स्पोर्टस उपलब्ध असतात. किनाऱ्यालगत तसेच वरसोली गावात बऱ्याच मोठ्या प्रमाणात चांगली हॉटेल्स, cottages, उपलब्ध आहेत. हिरव्यागार झाडीने आच्छादलेले वरसोली येथे शांत वातावरणात, जवळच असलेला समुद्रकिनारा तसेच कोकणी खाद्यपदार्थाचा आस्वाद पर्यटकांसाठी पर्वणीच असते
कसे पोहोचावे –
- अलिबाग ते वरसोली अंतर २ किमी
- मुंबई ते अलिबाग – १२० किमी
- पुणे ते अलिबाग – १४५ किमी
- मुंबई ते अलिबाग प्रवास बोटीने सुद्धा करता येतो. Gate way of India पासून ते मांडवा समुद्रमार्गे व नंतर रस्त्याने अलिबाग पर्यंत पोहोचता येते.
जवळील आकर्षणे-
- खांदेरी किल्ला (६ किमी )
- अलिबाग समुद्रकिनारा (२ किमी )
- वरसोली विठ्ठल मंदिर (१ किमी )
- वरसोली विठ्ठल मंदिर (२ किमी )