Search
Sign In

अलिबागची चुंबकीय वेधशाळा - Hosted By

0

विविधतेने नटलेल्या आपल्या भारताचे हवामान सुद्धा तेवढेच वैविध्यपूर्ण. अशा या हवामानाचा अभ्यास सुद्धा तेवढाच क्लिष्ट पण महत्वाचा. मासेमारी, सागरी वाहतूक, शेती, अशा अनेक महत्वपूर्ण कामांसाठी हवामानाचा अचूक अंदाज काढण्यासाठी व पृथ्वीच्या अंतरंगातील लोहचुंबकीय शक्तीचे संशोधन आणि आलेखन करण्यासाठी अलिबागच्या वेधशाळेचे निर्मिती झाली, व हि वेधशाळा सातत्याने हे महत्वपूर्ण कार्य करीत आहे.

इतिहास –

केवळ रायगड नव्हे तर भारताच्या हवामानविषयक अभ्यासासाठी अतिशय महत्वाची चुंबकीय वेधशाळा ( Magnetic Observatory ) अलिबागला आहे. या जगप्रसिद्ध वेधशाळेचे स्थापना १९०४ मध्ये झालेली असून तिचा सुवर्ण महोत्सव १२ डिसेंबर १९५४ रोजी व अमृत महोत्सव यथावकाश संपन्न झाला. पृथ्वीच्या अंतरंगातील लोहचुंबकीय शक्तीचे संशोधन आणि आलेखन करणारी हि भारतातील पहिली चुंबकीय वेधशाळा आहे. पृथ्वी हि एक लोहचुंबक असून तिच्या पोटात लोहचुंबकीय शक्तीचा संचार चालू असतो. या गूढ शक्तीचे संशोधन व आलेखन करणे हे कार्य येथे अविरत चालू आहे. अलिबाग वेधशाळा कुलाबा वेधशाळेचे शाखा आहे. मच्छिमारी व व्यापारी वाहतुकीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईतील कुलाबा वेधशाळेचे १७२६ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भारत सरकारने केली.  भारताचा पश्चिम किनारा हा भारताच्या हवामानविषयक अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचा असल्याकारणाने सरकारने कुलाबा वेधशाळेत विविध सुविधा उभारण्याचा पुष्कळ प्रयत्न केला.

सन १८४१-१८४६ या काळात कुलाबा वेधशाळेचे पृथ्वीच्या पोटातील चुंबकीय शक्तीचे मार्गदर्शक संशोधन आणि टिपणे करण्यात येऊ लागली. पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीचे नैसर्गिक घटनांमध्ये महत्वाचे स्थान असून तशी चुंबकीय शक्ती असलेला पत्ता कुलाबा ते अलिबागच्या भूभागात असल्याचे शास्त्रज्ञाचे मत आहे. म्हणून हवामानाच्या अंदाजाबरोबरच चुंबकीय शक्तीचे वेधन करण्याचे कार्य सुरु झाले.  त्यासाठी बरीच यंत्रसामुग्री कुलाबा वेधशाळेत आणण्यात अली. हे संशोधन कार्य १८७२ पासून सुरु झाले. भूभागातील चुंबकीय शक्तीचे आलेखनही नोंदण्यास प्रारंभ झाला. मुंबई नगरात विजेचा वापर करण्याचे ठरल्यानंतर चुंबकीय संशोधन कार्यावर विजेचा परिणाम होते अपरिहार्य असल्याने कुलाबा वेधशाळेतील चुंबकीय संशोधन साधने व यंत्रसामुग्री दुसरीकडे पण जवळच स्थलांतरित करणे भाग पडले. म्हणून १९०४ मध्ये चुंबकीय शक्ती संशोधन शाखा अलिबागला स्थलांतरित करून अलिबाग वेधशाळेचे भारत सरकारने स्थापना केली. पुढील दोन वर्षात कुलाबा येथील चुंबकीय संशोधन पूर्ण बंद करून अलिबागला केंद्रित करण्यात आले.

इमारत –

अलिबाग वेधशाळेतील यंत्रसामग्री , विशेषतः मॅग्नेटोग्राफ़ , अत्यंत सूक्ष्मदर्शी असून हि विशिष्ट दगडाने बांधलेल्या इमारतीत ठेवलेली आहे. इमारतीतील उष्णतामानात फारसा बदल होऊ नये अशी तिची रचना आहे. इमारतीच्या दगडात लोह धातू असू नये म्हणून पोरबंदरचा दगड वापरण्यात आला आहे. लोखंडाचा उपयोग अजिबात केलेला नाही. पृथ्वीच्या अंगच्या चुंबकीय शक्तीचे अचूक मोजमाप सूक्ष्मपणे करणे शक्य व्हावे म्हणून वेधशेजवळ वीजनिर्मीनी करण्यास मनाई आहे. त्यामुळे अलिबाग शहरात वीजनिर्मीनी होत नव्हतो व शहरात विजेचा वापरही नव्हता. अलीकडील काळात मात्र बाहेरून वीज पुरवठा करून काही बंधने ठेऊन वीज वापर करण्यात येत आहे. वेधशाळेत एका इमारतीत मॅग्नेटोमीटर्स व दुसऱ्या इमारतीत मॅग्नेटोग्राफ्स बसविण्यात आले आहेत. अशी हि जगप्रसिद्ध वेधशाळा रायगड जिल्ह्याचे भूषण आहे.

वेधशाळेबाबत खालील उतारा उदबोधक आहे –

“The most important data in geophysics maintained here pertaining to 115 years elevates its position to the few of it’s kind in the world.  The system of its observation and experiments is closely connected with the field of magnetism. Hence the building is so designed as anot to get affected by the external disturbances both radiographic and electrical. The basic data in Geographics collected here is being extensively used by the scientists all over the world. Furnished with the most modern equipments and apparatus, it transmits intimation of the magnetic storms to come, which obstruct Radio and telecommunication waves. From time to time the observatory publishes data incorporating it’s findings. It has large demand from the scientists all over the world.”

अलिबागच्या वेधशाळेला भेट देण्यासाठी सरकारी परवानगीची आवशक्यता आहे. पण बाहेरून हि वेधशाळा आपल्याला समुद्रकिनाऱ्यावरून सुद्धा पाहता येते. वेधशाळेचे प्रेवेशद्वार समुद्रकिनाऱ्याला समांतर रस्ता जो पुढे वरसोलीकडे जातो त्या रस्त्याच्या डाव्या बाजूला आहे.

संदर्भ – रायगड गॅझेटिअर

Tags

Location / Contacts :

Weather in City :

Working Hours :

Closed UTC + 5.5
  • Monday10:00 - 17:00
  • Tuesday10:00 - 17:00
  • Wednesday10:00 - 17:00
  • Thursday10:00 - 17:00
  • Friday10:00 - 17:00
  • Saturday10:00 - 17:00
  • SundayDay Off

More Historical Places Around

Similar Listings

Claim listing: अलिबागची चुंबकीय वेधशाळा

Reply to Message

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password