चौल नाक्यापासून थोडे पुढे गेले कि डाव्या बाजूच्या रस्त्याने साधारणतः दिड ते दोन किमी अंतरावर भोवाळे तळे आहे येथूनच श्री दत्तमंदिरामध्ये जाण्याचा रस्ता आहे. साधारणतः १८ व्या शतकातील पूर्वार्धात हे मंदिर बांधले गेले १८१० मध्ये येथे एक दत्तभक्त राहत होता त्याने येथे दत्तपादुका आणून ठेवल्या १८३१ मध्ये दीपमाळ बांधण्यात आली. १८३४ साली प्रदक्षिणा मार्ग व वर कळस बांधण्यात आला. १८४३ ते १८५२ या काळात इथं गणेशभट गुजराथी प्रभासकर यांनी मंडप आणि घर बांधून घेतले तर इथं चढून येणे कठीण असल्याने नारायण रामचंद्र खात्री यांनी १८५७ साली ७५०-८०० पायऱ्यांचा मार्ग बांधून घेतला. १८५७ रोजी पाषाणाची त्रिमुखी दत्ताची सहा हात असलेली सुंदर मूर्ती पादुकांच्या शेजारी बसविण्यात आली.
साधारणतः साडे सातशे पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या बाजूला स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी मठ आहे. त्यानंतर सभागृह, समाधी साधना कुटी, पाठारे क्षत्रिय पाचकळशी समाजाचे विश्रामधाम, धुनीमंदिर आहे. पाठारे क्षत्रिय पाचकळशी समाजासाठी हे महत्वाचे ठिकाण असून इथं दत्त जयंतीचा उत्सवही मोठ्या जोमाने साजरा होतो.
डोंगरावरून आजूबाजूचा कित्येक किलोमीटर चा परिसर येथून दिसतो. पश्चिमेकडे रेवदंड्याचा आगरकोट, कोर्लईचा किल्ला, रेवदंडा आणि आग्रावची खाडी दिसते. उत्तरेकडे हिंगुलजा देवीची टेकडी दिसते.
भोवाळे येथून दत्तमंदिराकडे जाण्याच्या पायरी मार्गावर वाटेवर उजवीकडे एक गोरखचिंचेचा भाला मोठा वृक्ष आहे. हा वृक्ष फार जुना व दुर्मिळ आहे. अलिबागमध्ये वरसोली मध्ये अजून एक असा वृक्ष आढळतो.
भोवाळे येथून थोडे पुढे गेल्यावर सराई गावातून नव्याने तयार केलेला गाडीरस्ता आहे. ह्या रस्त्याने वरपर्यंत गाडीने जात येते.
उत्सव – येथे दर वर्षी श्री दत्तजयंती च्या दिवशी मोठी यात्रा भरते, व पुढे पाच दिवस चालते. तसेच मंदिरामध्ये भजन कीर्तनासारखे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
Nearby Attractions –
How to reach –
- Distance from Alibag – 18 km.
- Mumbai to Alibag– 100 km.
- Pune to Alibag – 150 km.
- Local transport is available
Amenities
- Bike Parking
- Car Parking