Search
Sign In

अलिबागमधील बारव / पुष्करिणी

अलिबागमधील बारव / पुष्करिणी

आपल्या भारत वंशामध्ये ऐतिहासिक शहर म्हटले कि पुरातन मंदिरे आणि पुष्करिणी किंवा बारव हे त्याचा अविभाज्य घटक असतात. आत्ताच्या आधुनिक काळामध्ये ज्याप्रमाणे एखाद्या शहरासाठी पाण्याचे नियोजन केले जाते त्याच प्रमाणे पूर्वी सुद्धा पाण्याचे नियोजन केले जात असे. आणि त्याचाच भाग म्हणजे विहिरी, पुष्करिणी किंवा बारव होत. पुष्करिणी किंवा बारव ह्या जास्त करून एखाद्या मंदिराजवळ आढळून येतात. याचे संभाव्य कारण म्हणजे त्या मंदिराच्या बांधकामासाठी लागणारा दगड काढताना झालेला खड्डा, तसेच पवित्र जागेमध्ये जाताना हात पाय धुवून आतमध्ये जाण्यासाठी करण्यात आलेला पाणी साठा असे असावे. ह्याच पाण्याचा वापर नंतर रहिवाश्यांना करता यावा हा सुद्धा हेतू असावा. आणि पाणी कमी झाले कि त्यामध्ये उतरण्यासाठी सभोवताली बांधलेल्या पायऱ्या असतात. पूर्वीच्या काळी ह्याच पायऱ्यांचा वापर जनावरांना सुद्धा पाणी पिण्यासाठी होत असे.  बारावांमध्ये पावसाळ्यात पाण्याचा साठा होत असे तसेच मध्यभागी विहीरसदृश खोल भाग असे जेथे नर्सर्गिक पाण्याचे स्रोत सुद्धा असत. 

ऐतिहासिक अलिबाग सुद्धा ह्याला अपवाद नाही. अलिबाग परिसरामध्ये बऱ्याच प्रमाणात पुरातन देवालये आहेत, आणि तितक्याच प्रमाणात बारव सुद्धा आहेत. साधारणतः १५ च्या आसपास बारव अलिबाग परिसरामध्ये अजूनही आहेत, त्यांचाच घेतलेला हा आढावा,

श्री राम मंदिर – (रामनाथ)

सरखेल कान्होजी आंग्र्यांच्या दरबारी असलेले गोविंद रेवा सेठ यांनी बांधलेले हे मंदिर, मंदिरासमोरच चौरसाकार बारव दिसून येते. दोन बाजूस मोठाली तुळशी वृंदावने आहेत तर इतर दोन बाजूस मोठ्या दीपमाळा दिसून येतात. दगडी बांधकाम असलेली हि बारव पावसाळ्यामध्ये पूर्ण भरते तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा यामध्ये पाणी असते.
मंदिराच्त मागच्या बाजूस उजवीकडे आणून एक बारव दिसून येते, पण हि फारच दुरावस्थेमध्ये आहे. तिचे जतन करणे आवश्यक आहे.

श्री राम मंदिर

श्री बेलेश्वर (वरसोली)

वरसोलीच्या समुद्रकिनाऱ्यावर जाताना डावीकडे श्री बेलेश्वराचे साधारणतः ३५० वर्षे जुने मंदिर आहे. मंदिराच्या समोर रस्त्यापलीकडे दाट झाडीमध्ये एक बारव आहे. सभोवताली दाट व जुनी झाडे असल्याने हि बारव लवकर दिसून येत नाही. पायऱ्यांची व काठाची बऱ्याच प्रमाणात पडझड झालेली दिसते. ह्या बारव चे जतन होणे गरजेचे आहे.

मंदिराविषयी माहिती

श्री कनकेश्वर ब्रह्मकुंड – (कनकेश्वर)

कनकेश्वराच्या डोंगरावर चढल्यावर मंदिराच्या आधी प्रथम उजव्या बाजूला मारुतीचे मंदिर दिसते व बाजूलाच ब्रह्मकुंड आहे. हे ब्रह्मकुंड म्हणजेच तांबड्या चिऱ्यांमध्ये बांधलेली बारव. चारही बाजूने चीऱ्याच्या भिंती असून चौकोनी आकाराची हि बारव आहे. पावसाळ्यामध्ये तुडुंब भरून हि बारव वाहू लागते, व कनकेश्वराला येणारे बरेच भक्त येथे पोहोण्याचा आस्वाद घेतात. ह्या बारवेच्या चारही बाजूने दगडी भिंती आहेत.

मंदिराविषयी माहिती

श्री भीमेश्वर – (नागाव)

नागावमधून मुख्य रस्त्यावरून चौलकडे जात असताना उजवीकडे भीमेश्वर हे शिवमंदिर दिसते. मंदिरासमोरच चौरस आकाराची बारव आहे. पावसाळ्यामध्ये हि बारव पूर्णपणे भरते.

मंदिराविषयी माहिती

श्री वंखनाथ – (नागाव)

नागावमधून मुख्य रस्त्यावरून चौलकडे जात असताना उजवीकडे वंखनाथ हे शिवमंदिर दिसते. मंदिरासमोरच चौरस आकाराची बारव आहे. पावसाळ्यामध्ये हि बारव पूर्णपणे भरते. पावसाचे पाणी थोडे कमी झाले कि बारवेच्या आतमधील पायऱ्यांवरून चारही बाजूला चालता येते. व याच ठिकाणी काही ठराविक अंतरावर दगडामध्ये कोरलेले नक्षीदार देवडी स्वरूप जागा दिसतात, यामध्ये पूर्वी कदाचित दिवे ठेवत असत.

मंदिराविषयी माहिती

श्री मुख्य मुखरी – (चौल)

चौल जवळ मुख्य मुखरी गणपती मंदिर आहे. मंदिरासमोरच एक मध्यम आकाराची बारव आहे. पावसाळ्यामध्ये हि बारव पूर्णपणे भरते.

मंदिराविषयी माहिती

श्री रामेश्वर – (चौल)

चौल येथील प्रसिद्ध अशा श्री रामेश्वर मंदिरासमोर प्रशस्त आकाराची बारव आहे. अलिबाग परिसरातील हि सर्वात मोठी बारव असावी. हिरवे शार दिसणाऱ्या पाण्यामध्ये मंदिराचे प्रतिबंब अतिशय विलोभनीय दिसते. त्रिपुरारी पौर्णिमेला येथे दीपोत्सव साजरा केला जातो, यावेळी बारव दिव्यांनी सजवली जाते. पावसाळ्यामध्ये हि बारव पूर्ण भरते आणि येथील स्थानिक येथे पोहण्याच्या स्पर्धा आयोजित करतात. बारव मध्ये उतरायला दोन बाजूने पायऱ्या आहेत. मधोमध एक लाकडी खांब पुरलेला आहे.

मंदिराविषयी माहिती

श्री शितलादेवी – (चौल)

चौल येथील प्रसिद्ध अशा श्री रामेश्वर मंदिरासमोर प्रशस्त आकाराची बारव आहे. अलिबाग परिसरातील हि सर्वात मोठी बारव असावी. हिरवे शार दिसणाऱ्या पाण्यामध्ये मंदिराचे प्रतिबंब अतिशय विलोभनीय दिसते. त्रिपुरारी पौर्णिमेला येथे दीपोत्सव साजरा केला जातो, यावेळी बारव दिव्यांनी सजवली जाते. पावसाळ्यामध्ये हि बारव पूर्ण भरते आणि येथील स्थानिक येथे पोहण्याच्या स्पर्धा आयोजित करतात. बारव मध्ये उतरायला दोन बाजूने पायऱ्या आहेत. मधोमध एक लाकडी खांब पुरलेला आहे.

मंदिराविषयी माहिती

श्री मल्लेश्वर – (चौल)

चौलमधून बायपास ये रेवदंडा पुलाकडे जाताना मल्लेश्वर हे शिवमंदिर उजव्या बाजूला दिसते. मंदिरासमोर माध्यम आकाराचे पटांगण आहे. याच पटांगणाचा लागून एका वादाच्या झाडाजवळ हि बारव आहे थोडी उंचावर चढून मग हि बारव दिसून येते.

मंदिराविषयी माहिती

श्री भगवती एकवीरा – (चौल)

चौल येथे भोवाळे तलावापुढे उजव्याबाजूने आत गेलो कि श्री भगवती एकवीरा देवीचे मंदिर दिसते, मंदिराच्या डाव्या बाजूला एक बारव आहे. बारवेच्या आजूबाजूला थोडी झाडे वाढली असून समोरच पायऱ्या दिसून येतात.

मंदिराविषयी माहिती

श्री सोमेश्वर – (चौल)

चौलमधून भोवले तलावापुढे सराई गावाला लागून श्री सोमेश्वराचे मंदिर आहे, ह्या मंदिराच्या बाजूला एक बारव आहे, व हिच्या एका बाजूला अरुंद पायऱ्या आहेत. उन्हाळ्यामध्ये पाणी आटत असले तरी पावसाळ्यामध्ये हि बारव पूर्ण भरते. ह्याच बारवेच्या बाजूला एका वडाच्या झाडाखाली एक पुरातन सतीशिळा ठेवलेली दिसते.

मंदिराविषयी माहिती

श्री क्षेत्रपाल – (मुरुड)

मुरुड येथील श्री दत्त टेकडीवरून श्री क्षेत्रपाल येथे जात येते, या ठिकाणी शंकराचे मंदिर आहे व शेजारीच कुलुपाच्या चवीच्या आकाराची विहीर आहे वरून गोलाकार व एका बाजूने पायऱ्या,  त्यामुळे वरून पाहताना एखाद्या कुलुपाच्या चावीच्या आकाराची हि विहीर दिसते. आजूबाजूला डोंगर आणि घनदाट झाडी असल्याने येथील पाणी थंडगार असते. याच ठिकाणी एक वीरगळ दिसून येते. मंदिराविषयी माहिती

श्री भोगेश्वर – (मुरुड)

मुरुड येथील भोगेश्वर पाखंडीच्या शेवटी हे श्री भोगेश्वराचे मंदिर आहे, मंदिरासमोरच एक मध्यम आकाराची बारव दिसून येते तीन बाजूने दगडी भिंत व एका बाजूने पायऱ्या दिसून येतात. पावसाळ्यामध्ये हि बारव पूर्ण भरून जाते व येथील स्थानिक मुले येथे पोहण्याचा आनंद घेतात.

मंदिराविषयी माहिती

यामधील काही पुष्करिणी / बारव अजूनही वापरात असल्याने सुस्थितीत आहेत, परंतु अजूनही काही बारव ह्या भग्न किंवा दुर्लक्षित अवस्थेमध्ये आहेत, आणि ह्यांचे जतन करून त्यांना पुनरुज्जीवन देणे फार गरजेचे आहे. शेवटी हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे आणि तो आपणच जतन करायला हवा.

  • 394
  • ऐतिहासिक
  • Comments Off on अलिबागमधील बारव / पुष्करिणी

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password