Search
Sign In

पापलेट फ्राय

पापलेट फ्राय

अलिबागच्या समुद्रातील मासे फार प्रसिद्ध आहेत. अलिबागच्या खोल समुद्रातील पॉपलेट (Pomphret) हे त्यातील एक. मोठ्या आकाराचे पॉपलेट हे साधारणतः तव्यामध्ये तळून खाल्ले जातात. अलिबागचा खास बनवलेला मसाला वापरून पॉपलेट फ्राय बनवले जाते.

समुद्रातून पकडून आणलेले फ्रेश पॉपलेटच्या तुकड्या कराव्यात आणि स्वच्छ करावेत. त्यामध्ये हळद, मसाला, हिंग,मीठ याचे मिश्रण पॉपलेटच्या तुकड्यांना लावून थोडा वेळ ठेवावेत. नंतर ओल्या चिंचेचा रस काढून त्यात टाकावा. बारीक चिरलेली कोथिंबीर व वाटलेलं खोबरे त्यामध्ये टाकावे. हे सर्व मिश्रण थोडा वेळ तसेच ठेवावे म्हणजे पॉपलेट मॅरीनेट होतात. नंतर तव्यामध्ये तेल टाकून लसणाची फोडणी बनवावी व पॉपलेट च्या तुकड्या त्यात टाकाव्यात. नंतर वाफेवर शिजू द्याव्यात. थोड्या वेळाने सर्व तुकड्या हळुवार पालटाव्या. खमंग तळलेले पॉपलेट तयार

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password