Search
Sign In

पावसाळी पालेभाज्या

पावसाळी पालेभाज्या

अलिबाग आणि परिसरामध्ये जेव्हा जून महिन्यामध्ये पाऊस पडतो तेव्हा आजूबाजूच्या डोंगरावर व जंगलामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती उगवतात, यातील बऱ्याच प्रकारच्या वनस्पती म्हणजेच या पावसाळी पालेभाज्या. या पालेभाज्या फक्त २ ते ३ आठवडे उपलब्ध असतात. बऱ्याच भाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात. साधारणतः पाऊस सुरु झाला कि बऱ्याच वेळा आपली तब्येत थोडीफार कमीजास्त प्रमाणात खराब होते. अशा वेळी या भाज्यांचे औषधी गुणधर्म उपयोगात येतात. हि सुद्धा निसर्गाची एक किमयाच म्हणावी लागेल. आणि हे अलिबागचे एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.

या भाज्यांमध्ये कुलू, भारंगी, आंबट वेल, कोर्लई, कंटोली, अशा प्रकारच्या भाज्या येतात. या सर्व भाज्यांना विशिष्ट चव असते. या भाज्या फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीला उगवितात व नंतर या वर्षभर आढळत नाही. त्यामुळे अलिबागच्या बाजारामध्ये या भाज्यांना फार मोठी मागणी असते. या प्रत्येक भाज्या बनविण्याच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या असतात.

  • 320
  • Farming
  • Comments Off on पावसाळी पालेभाज्या

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password