Search
Sign In

Betel Nuts

Betel Nuts

अलिबाग कोकण म्हटले कि समोर दिसतात नारळी पोफळीच्या हिरव्यागार बागा. कोकणची शान म्हणजे ह्या बागा , वाड्या. पोफळी म्हणजेच सुपारीचे झाड. सरळ उंच साधारणतः ३० ते ४० फुटापर्यंत लांब आणि वर हिरवागार डोलारा, त्या हिरव्यागार डोलाऱ्यातून डोकावणाऱ्या पिवळ्याशार सुपारीचे घड. कोकणात प्रतेय्क घराच्या आजूबाजूला  तसेच मागील वाडीमध्ये हमखास दिसणारे हे झाड. सुपारीला मध्यमप्रतीची, चुनखडीयुक्त जमीन आणि आर्द्रतायुक्त थंड हवामान पोषक असून हे पीक अलिबाग श्रीवर्धन व मुरुड तालुक्यात जास्त प्रमाणात घेतले जाते.  सुपारीचे रोप तयार करण्यासाठी मोठ्या सुपाऱ्या निवडून भुसभुशीत जमिनीत २ इंच खोलवर पुरतात, एक वर्षाचे रोप ६० x ६० सेमी च्या खड्ड्यात शेणखत व  रासायनिक खताचे योग्य प्रमाणात मिश्रण घालून लावतात. साधारणतः सुपारी आणि नारळाची झाडे एकत्रपणे थोडे थोडे (२ मीटर) अंतर ठेवून लावली जातात. सुपारीचे झाड नारळाच्या झाडाएवढेच उंच असले तरी खोड रुंदीने कमी असते व पानांच्या डोलारा सुद्धा थोडा कमी असतो नारळाप्रमाणेच वर्षभर सुपारीचे उत्पादन मिळते.

सुपारीचे झाड दिसायला जितके सुंदर तितकेच सुपारीचे विविध उपयोग. खायच्या पानामध्ये सुपारी हा अविभाज्य घटक. एवढेच नाही तर पूजा पाठ व धार्मिक कार्यांमध्ये सुद्धा सुपारीचे महत्व फार मोठे आहे. आपल्याला सुपारीचे हे उपयोग माहिती आहेत परंतु सुपारीचे औषधी गुणधर्म  सुद्धा बरेच आहेत व योग्य उपयोग केल्यास बऱ्याच प्रमाणात फायदा होऊ शकतो.

अलिबाग आणि परिसरात हवामान सुपारीसाठी फार उपयुक्त असल्यामुळे येथे उत्तम प्रतीची सुपारी पिकवली जाते. अलिबाग ते मुरुड या पट्यात सुपारीचे पीक मोठ्या  प्रमाणात घेतले जाते. आणि म्हणून येथील व्यापारास चालना मिळावी म्हणून मुरुड येथे साधारणतः १९३८ च्या दरम्यान सुपारी संघ स्थापन झाला.

सुपारी संघ मुरुड (SSM)-

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सर्वात पहिला सुपारी संघ म्हणून मुरुड येथील सुपारी संघ प्रसिद्ध आहे. तालुक्यातील उत्तम प्रतीच्या तयार होणाऱ्या सुपारीस चांगला बाजार भाव मिळावा व व्यापारास चालना मिळावी या उद्धेशाने सुपारी संघाची स्थापना झाली. येथील सुपारीला पूर्ण देशभरामध्ये प्रचंड मागणी असते.

अधिक माहिती

खाजगी व्यापारी -

सुपारी संघाप्रमाणेच अलिबागजवळ नागाव,चौल येथे काही उद्योजक खाजगीरित्या सुपारीचा व्यापार करतात. गावातील जवळची सुपारी गोळा करून त्यातून रोठे काढून विविध स्तरातील सुपारी मुंबई व वाशी येथील बाजारात विक्रीसाठी नेली जाते. 

अधिक माहिती

येथे पूर्वी बऱ्याच घरांमध्ये खायच्या पानाचे ताट किंवा पेटी असायची त्यात घरची सुपारी व घरचीच खायची पाने असत. मग घरातील वयस्कर माणसे जेवण झाले कि पान खायला बसायचे. सुपारी फोडायला अडकित्ता असायचा. अशी हि सुपारी कोकणातील घराघरात दिसून यायची.

हल्लीच्या काळात सुपारी बऱ्याच प्रमाणात खाद्यपदार्थामध्ये वापरतात, तसेच तिचे औषधी गुणधर्म विचारात घेतले तर – तोंड येण्याची समस्या, पोटातील कृमी, प्रवासात उलटी होणे, दात दुखी ची समस्या, अशा खूप तक्रारी सुपारीच्या साहाय्याने कमी होतात. आजकाल तर सुपारीची झाडे, मोठं मोठ्या शहरांमध्ये शोभेसाठी सुद्धा लावलेली दिसतात.

Sign In alibagonline

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password