नागाव समुद्रकिनारा –
नागग्राम म्हणून सुद्धा पूर्वी ओळखले जाणारे आंग्रेकालीन अष्टागरातील एक ठिकाण. भव्य व लांब सडक असा समुद्रकिनारा लाभलेले व अलिबाग पासून साधारणतः ८ किमी असलेले, नारळी पोफळीच्या घनदाट बागा असलेले निसर्गरम्य ठिकाण.
नागावच्या मुख्य रस्त्याला लागूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे येथूनच मुख्य समुद्रकिनाऱ्याला जायचा रस्ता आहे. मुख्य रस्त्यापासून साधारणतः १ ते २ किमी आतमध्ये गेलो कि समुद्रकिनारा लागतो. किनाऱ्यालगत गाडीतळ आहे. व जवळच बरीचशी छोटी मोठी हॉटेल्स आहेत. समुद्रकिनाऱ्यावर बऱ्याच प्रमाणात वॉटरस्पोर्टस उपलब्ध असतात. समुद्राकडे जाण्याच्या रस्त्यालगत बऱ्याच प्रमाणात राहण्याची व खाण्याची सोय असलेले कॉटेजेस आहेत.
गाडीतळाजवळ एक विशिष्ट प्रकारचे ताडाचे झाड आढळते. माडाच्या झाडाला कधी फांद्या नसतात, पण या झाडाला बऱ्याच फांद्या असून वरच्या बाजूला वृक्षाप्रमाणे हा माड दिसतो, अशा प्रकारच्या माडाला रावणमाड म्हणतात.
साताड बंदर –
नागाव समुद्रकिनाऱ्याला लागताच अजून एक स्वच्छ व सुंदर किनारा आहे तो म्हणजे साताड. साताड बंदराला जाण्याचा रस्ता थोडा लांब आहे व तेथे तुम्हाला निर्मनुष्य किनारा दिसतो . येथे कोणत्याही प्रकारचे वॉटरस्पोर्टस नाहीत. शांत सुंदर समुद्र अनुभवायचा असेल तर येथे जरूर भेट द्या.
जवळील आकर्षणे-
कसे पोहोचावे –
- अलिबाग पासून अंतर – 9 किमी.
- मुंबई ते अलिबाग – 100 किमी.
- पुणे ते अलिबाग – 145 किमी.
- स्थानिक वाहतूक उपलब्ध आहे