चौल वरून वावे गावाकडे जाण्याच्या मार्गावर सोमेश्वर मंदिराच्या थोडंसं पुढे गेल्यावर हा कलावंतिणीचा वाडा अगदी रस्त्याजवळच पाहायला मिळतो. सराई नावाच्या गावात हा वाडा आहे. सराई म्हणजे धर्मशाळा. पूर्वी सिद्धीच्या काळात हे कलावंतिणींचे तांडे काफिले आपली कला सादर करत फिरत असत. त्यांच्या निवासासाठी आणि कला सादर करण्यासाठी हा वाडा बांधण्यात आलेला.
वाड्याचे प्रवेशद्वार आजही शाबूत आहे व काही अंतरावर अजून एक रचना पाहावयास मिळते या दोन वास्तूंच्या सभोवताली वाड्याच्या भिंती असाव्यात. आत्ता फक्त प्रवेशद्वार व मागच्या बाजूचे थोडीशी वास्तु शाबूत आहे , व मधल्या जागेवर शेती केली जाते. वाड्याच्या मागील बाजूस पाण्याच्या सोयीसाठी एक तळे आहे.
प्रवेशद्वाराच्या डावीकडचा भाग कोसळलेला आहे. येथे एक दगडी पायऱ्यांचा जिना आहे. यावरून असा अंदाज लागतो कि वरच्या बाजूस सुद्धा काही बांधकाम असावे. वाड्याच्या भिंतींना काही प्रमाणात डागडुजी केल्याचे दिसते. या जिन्याच्या विरुद्ध बाजूस अजून एक जिना असल्यासारखी रचना आहे परंतु हि जागा दगडकामानी बंद केली आहे.
अशी हि चौल नजीकची अजून एक ऐतिहासिक वास्तू जरूर पहा.
कसे पोहोचाल-
- अलिबाग – चौल १५ किमी
- मुंबई अलिबाग – १०० किमी
- पुणे अलिबाग – १५० किमी
- अलिबागपासून स्थानिक वाहतूक उपलब्ध आहे
जवळील आकर्षणे –
Amenities
- Bike Parking