अलिबाग जवळ वेश्वी , कुरुळ आणि बेलकडे गावाच्या माधोमध असलेल्या रसांनी नावाच्या टेकडीवर असलेले हे दत्तमंदिर. अत्तिशय प्रसन्न व आल्हाददायक वातावरणाच्या सान्निध्यात असलेले हे मंदिर.
प्रख्यात विद्वान वेदाचार्य कृ. बा. गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली मि मार्गशीर्ष शु द्वादशी गुरुवार दि २२ डिसेंबर १९७७ रोजी दु ११ वाजता श्री. सौ. ग. चि. पाटील यांच्या शुभहस्ते श्री दत्ताची प्राणप्रतिष्ठापना झाली. ह्या मंदिराची देखभाल सध्या तीनही गावांकडून करण्यात येते. दरवर्षी श्री दत्तजयंती ला यात्रा भरते. ही यात्रा पुढे पाच दिवस चालते.
टेकडीवर जाण्यासाठी कुरुळ आणि वेश्वी गावातुंन रास्ता आहे. गाडी पूर्ण मंदिरापर्यंत जाते. येथे बरेच जण पाय मोकळे करण्यासाठी आणि व्यायामासाठी नित्य नेमाने येतात.
याच टेकडीवर मंदिरामागे डॉक्टर श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे वृक्ष लागवड करण्यात आली आहे. साधारणतः १५ वर्षांपूर्वी हि लागवड करण्यात आली असून त्याची देखभाल अजूनही अविरतपणे चालू आहे.
कसे पोहोचाल?
वेश्वी दत्तमंदिरात जाण्यासाठी’कुरळ आणि वेश्वी अशा दोन्ही गावांमधून रास्ता आहे.
- अलिबागपासून अंतर ५ किमी
- अलिबाग पुणे : १४५ किमी
- अलिबाग मुंबई :१२० किमी
जवळचे आकर्षण –
- सिद्धेश्वर धबधबा (९ किमी )
- अलिबाग समुद्रकिनारा (६ किमी )
- आक्षी समुद्रकिनारा (७ किमी )
Amenities
- Bike Parking
- Car Parking