निसर्गाच्या सानिध्यात असलेले चहुबाजूने डोंगराने वेढलेले हे अलिबाग जवळील छोटेखानी धरण. पेण अलिबाग रस्त्यावर असलेले व अलिबागपासून साधारणतः १२ किमी अंतरावर असलेले हे धरण कार्लेखिंड व पळी या गावांच्या मध्ये आहे. पावसाळ्यामध्ये हे धरण तुडुंब भरून बांधावरून पाणी वाहू लागते. पावसाळ्यात हे धरण येथील रहिवाश्यांसाठी व पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षण ठरले आहे. आजूबाजूच्या डोंगरातील पाणी या धरणात येते व साठवले जाते. धरणाच्या मागील बाजूस ऐतिहासिक सागरगड दृष्टीस पडतो, ज्यामुळे हा परिसर अधिकच नयनरम्य वाटतो. अलीकडेच येथे एक पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे व जवळच्या गावांना पाणी पुरवठा करण्यात आला आहे.
बायोडायव्हर्सिटी गार्डन –
धरणाच्या जवळच एक “बायोडायव्हर्सिटी गार्डन” तयार करण्यात आले आहे. ही बाग निसर्गाचे संवर्धन करण्याचा, वनस्पति आणि प्राण्यांच्या मूळ प्रजातींना आपल्या परिसंस्थेमध्ये परत आकर्षित करण्याचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सर्व अभ्यागतांसाठी शिक्षण संसाधन केंद्र म्हणून काम करण्याचा प्रयत्न आहे. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या https://www.spbiodiversitygardens.com