अलिबागला मुंबईशी जोडणारा, अनेक चित्रपटांतून सर्वपरिचित झालेला, अनेक प्रसिद्ध सिनेकलाकार, उद्योजक, खेळाडू व धनाढ्य व्यक्तीचे राहण्यासाठीची आवडते ठिकाण असलेले मांडवा आणि समुद्रकिनारा. मुंबई समुद्रमार्गे जवळ असल्याने या किनाऱ्याला फार पूर्वीपासून महत्व प्राप्त झाले आहे. येथे फार मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होत असल्याने मोठ्या प्रमाणात व आधुनिक पद्धतीने जेट्टी चे बांधकाम झालेले आहे. जेट्टीच्या बाजूनेच समुद्रकिनाऱ्यावर जायचा मार्ग आहे. भरतीच्या वेळी किनाऱ्यावर जाता येत नाही. किनाऱ्यावरून मुंबईचा बराचसा भाग स्पष्ट दिसतो.
अलिबागपासून साधारणतः १९ किमी अंतर असलेल्या मांडवा येथे जायला स्थानिक वाहतूक सुद्धा उपलब्ध आहे. मुंबईशी जोडले गेल्यामुळे या ठिकाणी सतत दिग्गज सिनेकलाकार, खेळाडू, उद्योगपती अशा बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तींची ये जा सुरु असते
वाहतूक –
मांडवा जेट्टी मधून फार पूर्वीपासून मुंबई ते मांडवा अशी प्रवासी वाहतूक चालू आहे. मुंबई ते अलिबाग अशा प्रवाशी सेवा देणाऱ्या बऱ्याच संस्था येथे कार्यरत आहेत. अलीकडेच मुंबई ते अलिबाग अशी रो -रो सेवा सुरु झाली आहे. अलिबाग ते मुंबई हे साधारणतः ३ तासाचे रस्त्याचे अंतर समुद्रमार्गे अवघे ९० मिनिटांचे झाले आहे. रो-रो सेवेमुळे कार आणि मोठ्या गाड्या सुद्धा समुद्रमार्गे येऊ शकतात. बरीच नोकरदार मंडळी रोज या मार्गे ये-जा करत असतात. पावसाळ्यात मात्र हि सेवा खराब हवामानामुळे बंद असते. येथे नव्याने प्रशस्त वाहनतळ सुद्धा तयार केले आहे.
पॉपअप डाईनिंग रेस्टॉरंट –
मुंबईहून तुम्ही जेट्टी वर उतरलात कि तुमचे स्वागत करतात येथील विविध प्रकारची रेस्टॉरंट्स आणि छोटी छोटी दुकाने. येथे नव्याने उभारलेली पॉप-अप dinning रेस्टॉरंट हे नवीन आकर्षण पर्यटकांना आणि प्रवाश्यांना आकर्षित करतात.
जवळील आकर्षण –
मांडावा जेट्टी जवळच एक जुना टेहळणी बुरुज आहे.
समुद्रकिनाऱ्यालगतच मोठ्ठी अशी मांडवा जेट्टी आहे
ह्या परिसरात बऱ्याच मोठ्या हिरव्यागार नारळी पोफळीच्या बागा आहेत, आजूबाजूला अनेक सिनेकलाकार, खेळाडू तसेच बऱ्याच धनिकांचे बंगले आहेत.
- मांडवा जेट्टी
- करमरकर शिल्पालय ( ४ किमी )
- किहीम समुद्रकिनारा ( १३ किमी )
- नागेश्वर मंदिर आवास ( ६ किमी )
कसे पोहोचाल
- अलिबाग ते मांडवा ( २० किमी )
- गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा – रो रो , फेरी
- मुंबई ते अलिबाग (१२० किमी )
- पुणे ते अलिबाग (१४५ किमी )