रेवदंडा किनारा हे अलिबाग जवळील सुदंर ठिकाण आहे. अलिबाग पासून साधारण १७ कि.मी. अंतरावर रेवदंडा बीच आहे. हा कोकणातील प्रसिद्ध समुद्र किनारा आहे. रेवदंडा बीच हा अलिबाग जवळील एक अतिशय वेगळा समुद्र किनारा आहे. स्फटिकासारखे स्वच्छ पाणी आणि काळ्या वाळूने वेढलेला समुद्र किनारा हे इथले आकर्षण आहे. वाळू काळ्या रंगाची असल्यामुळे याला एक वेगळेच सौदर्य प्राप्त झाले आहे.
रेवदंड्याचा किल्ला –
रेवदंडा किनाऱ्यालगत रेवदांड्याचा ऐतिहासिक किल्ला आहे. कुंडलिका नदी जिथे आरबी समुद्राला मिळते त्या खाडीच्या मुखा जवळ रेवदंडा गाव आहे आणि तिथेच हा किल्ला आहे.
पर्यटन –
इथे मुंबई पुण्याहून पर्यटक आराम करण्यासाठी येतात. इथले वातावरण अतिशय शांत आहे. हिरव्यागार निसर्गाची देणगी या परिसराला लाभली आहे त्यामुळे शांत निवांत सुट्टी घालवण्या साठी बरेच प्रवासी रेवदंडा किनाऱ्या जवळ राहणे पसंत करतात.
रेवदंडा किनारा व त्याला जोडून असणारा रेवदंड्याचा किल्ला व इथले अफाट नैसर्गिक सौंदर्य यामुळे हि जागा अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे व्हिडिओग्राफी व शूटिंग. इथे बरेच जण pre-wedding शूटिंग करण्यासाठी येतात.
कॅम्पिंग –
ज्या लोकांना रेवदंडा बीचला भेट द्यायची इच्छा आहे त्यांनी किमान एक रात्र इथे घालवावी, कारण संध्याकाळी इथल्या सुंदर सूर्यास्ताचा देखावा पहाण्याचा आनंद घेता येईल. आणि जर रात्रीही मुक्काम करण्याची योजना आखली तर येथे समुद्रकिनार्या वर कॅम्पिंग कॉटेजची सुविधा आहे. समुद्रा लगतचे रात्रीचे आल्हाद दायक वातावरण अनुभवता येईल. परंतु त्यासाठी आधी बुकिंग करावे लागते. पर्यटकांना पाहिजे असलेले सर्व मजा, खाणे-पिणे आणि ते झाल्यावर, ते तार्यांवर टक लावून रात्र घालवू शकतात आणि झोपी जाऊ शकतात.
रेवदंडा किनारपट्टीच्या प्रदेशात आहे म्हणून फिश करी आणि भात या भागातील लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. इथे बंदर जवळ असल्यामुळे ताजे मासे खाण्यासाठी खवय्ये रेवदंडा बीच वर राहण्यास प्राधान्य देतात. समुद्र प्रेमींनी येथे भेट द्यायलाच हवी.
जवळील आकर्षणे-
- कोरलाई किल्ला
- विक्रम विनायक मंदिर (साळव)
- नागाव बीच
- आक्षी बीच
कसे पोहोचावे –
- अलिबाग पासून अंतर – 17 किमी.
- मुंबई ते अलिबाग – 100 किमी.
- पुणे ते अलिबाग – 145 किमी.
- मुरुड पासून अंतर – 32 किमी.
- स्थानिक वाहतूक उपलब्ध आहे
Amenities
- Bike Parking
- Friendly workspace
- Good for Kids